No Entry 2 : अनिल कपूर, सलमान आणि फरदीनला सिक्वलमध्ये 'नो एन्ट्री'! 'या' कलाकारांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 19:32 IST2024-01-30T19:32:06+5:302024-01-30T19:32:54+5:30
१९ वर्षांनी 'नो एन्ट्री'च्या सीक्वलची चर्चा रंगली आहे. 'नो एन्ट्री २' बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

No Entry 2 : अनिल कपूर, सलमान आणि फरदीनला सिक्वलमध्ये 'नो एन्ट्री'! 'या' कलाकारांची वर्णी
२००५ साली प्रदर्शित झालेला 'नो एन्ट्री' हा कॉमेडी सिनेमा प्रचंड गाजला होता. सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, लारा दत्ता, बिपाशा बासू, सेलिना जेटली अशी या सिनेमाची स्टार कास्ट होती. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. आता जवळपास १९ वर्षांनी 'नो एन्ट्री'च्या सीक्वलची चर्चा रंगली आहे. 'नो एन्ट्री २' बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'नो एन्ट्री २' सिनेमासाठी बोनी कपूर आणि झी स्टुडियोजने हातमिळवणी केली आहे. या सिनेमाची स्टारकास्टही फायनल झाल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच अनीस बजमीच 'नो एन्ट्री २'चं देखील दिग्दर्शन करणार आहेत. पण, 'नो एन्ट्री २' मधून अनिल कपूर, सलमान खान आणि फरदीन खानचा पत्ता कट झाल्याचं समजत आहे. 'नो एन्ट्री २'मध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत असणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच 'नो एन्ट्री २'च्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सीक्वलसाठी बोनी कपूर आणि अनीस बजमी एकमेकांना भेटत आहेत. डिसेंबर २०२४मध्ये या सिनेमांचं शुटिंग सुरू करण्यात येणार असून २०२५मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नो एन्ट्री २'साठी अभिनेत्रींचं कास्टिंग अद्याप झालेलं नाही. पण, या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.