Pathaan: 'फरक पडत नाही...', 'पठाण' वादावर शाहरूख खानने सोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:58 PM2022-12-15T18:58:38+5:302022-12-15T18:59:32+5:30
सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अयोध्येतील महंत राजू दास यांनी देखील या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकनीवरून वाद चिघळला आहे. तिने घातलेली बिकनी ही भगव्या रंगाची असल्यामुळे आक्षेप घेतला जात असून ट्रोल केले जात आहे. अशातच बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानने अखेर मौन तोडले आणि ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे.
शाहरूख खानने तोडली चुप्पी
सोशल मिडीया हे माध्यम बर्याचदा विशिष्ट संकुचित दृष्टीकोनातून चालवले जाते. मी कुठेतरी वाचले आहे की नकारात्मकता सोशल मीडियाचा वापर वाढवते. अशा प्रयत्नांमुळे सामूहिक जीवनात फूट पडते आणि विध्वंसक होते, अशा शब्दांत शाहरूखने या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली. "जग काहीही असो फरक पडत नाही, आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील", असे शाहरूख खानने कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हटले.
Social media is often driven by a certain narrowness of view that limits human nature to its baser self...I read somewhere-negativity increases social media consumption...Such pursuits enclose collective narrative making it divisive & destructive: Shah Rukh Khan at Kolkata pic.twitter.com/V9Q2K9EMck
— ANI (@ANI) December 15, 2022
25 जानेवारीला रिलीज होणार 'पठाण'
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' सिनेमा नववर्षात 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झाले. यात दीपिकाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. पण दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगातील बिकीनीत दिसली आहे. यावरुनच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदू संघटनांनी दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीला विरोध केला आहे. हिंदू महासभाचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनीही 'पठाण' चित्रपटावर बहिष्काराची मागणी केलीय.
भाजपा मंत्र्यांचा इशारा
14 डिसेंबरला मध्यप्रदेशचे गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 'बेशरम रंग' या गाण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. 'बेशरम रंग'मधील काही सीन्स आणि दीपिकाचे कपडे बदलले गेले नाहीत तर मध्यप्रदेशात हा सिनेमा रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. 'टुकडे टुकडे गँग'ची समर्थक दीपिका पादुकोणचे गाण्यातील कपडे आक्षेपार्ह आहेत. 'बेशरम रंग' गाणं घाणेरड्या मानसिकतेसह चित्रीत करण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला होता. 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाच्या अंगावर मुद्दाम भगव्या रंगाची बिकिनी दाखवल्याचा दावा काही लोक करत आहेत. इतके रंग असताना फक्त भगवाचं का निवडावा? असा प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत. नेमका याचवरून वातावरण तापले आहे. 'बेशरम रंग' हे 3 मिनिट 3 सेकंदाच गाणं युरोपमधल्या सुंदर लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आले आहे. दीपिका पदुकोणसोबत शाहरुख खान हाही या गाण्यात आपली मस्कुलर बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतोय. हे गाणं शिल्पा रावने गायले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"