Guess Who:फिर फिर फिरला तरीही कोणीही ओळखले नाही 'या' अभिनेत्याला, 'सूरज पे मंगल भारी' सिनेमात झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 12:50 PM2020-11-05T12:50:18+5:302020-11-05T13:09:15+5:30
साधारण एक दशकानंतर २०१२ मध्ये आलेल्या 'गॅंग्स ऑफ वासेपुर'मधून मनोज वाजपेयी यांना मोठं यश मिळालं.
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी आणि प्रतिभावंत कलाकार म्हणजे अभिनेता मनोज वाजपेयी. आपल्या अभिनयाने वेगळीच छाप पाडली आहे. प्रत्येक भूमिका त्यांनी तितक्याच मेहनतीने निभावली. लवकरच एका वेगळ्याच भूमिकेतू मनोज वाजपेयी रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'सूरज पे मंगल भारी' सिनेमात मनोज वायजपेयी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकताच त्याचा एक नवीन लूक समोर आला आहे.
मेकअपच्या मदतीने त्याचा लुक पूर्णपणे बदलण्यात आला आहे.त्यामुळे त्याला ओळखणेही कठिण जात आहे. सुरज पे मंगल भारी चित्रपटात नेहा शिवाय अन्नू कपूर, सुप्रिया पिळगावकर, विजय राज, सीमा पाहवा, मनोज पाहवा, नीरज सूद, मनुज शर्मा, वंशिका शर्मा, करीश्मा तन्ना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुरज पे मंगल भारी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्माने केले आहे.‘सूरज पे मंगल भारी’ हा सिनेमा ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरही रसिकांची भरघोस पसंती मिळाली त्यामुळे सिनेमाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल असा विश्वास सिनेमाच्या टीमला आहे.
मनोज वाजपेयींनी याबाबत सांगितले की, 'प्रत्येकालाच माहीत आहे की, या प्रश्नाचं महत्व काय आहे. मनोज वाजपेयी आणि इतर ज्याही कलाकारांची नावे घेतली जात आहेत या सर्वांचा प्रवास फार विलक्षण राहिलाय. आम्हाला स्वत:ला विश्वास बसत नाही की, आम्ही कसा वेळ घालवला. हा प्रवास कोणत्याही अॅंगलने सोपा म्हटला जाऊ शकत नाही. जेवढ्याही सिनेमाचा आम्ही भाग राहिलो, ते सिनेमे बनवण्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. हे तुम्हीही विसरू नका'.
मनोज वाजपेयी हे १९९६ मध्ये आलेल्या 'बॅंडीट क्वीन' सिनेमात एका छोट्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्यांनी काही वर्षांच्या संघर्षानंतर १९९९ मध्ये 'सत्या' सिनेमात रोल मिळवला होता. या सिनेमातील भीखू म्हात्रेच्या रोलने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. पण त्यानंतरही काम मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच होता.
साधारण एक दशकानंतर २०१२ मध्ये आलेल्या 'गॅंग्स ऑफ वासेपुर'मधून मनोज वाजपेयी यांना मोठं यश मिळालं. मनोज वाजपेयी आता ऑफबीट सिनेमांसोबतच कमर्शिअल सिनेमातही काम करताना दिसतात. तसेच वेबसीरीजमध्येही दिसतात. तरी सुद्धा त्यांच्या प्रतिभेनुसार हवं तसं काम मिळताना दिसत नाही.