PM Narendra Modi biopic: निवडणूक आयोग म्हणते, हे बायोपिक नाही तर हेजियोग्राफी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 02:59 PM2019-04-24T14:59:37+5:302019-04-24T15:02:38+5:30

विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे सध्या तरी दूर होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. चित्रपट पाहिल्यानंतर निवडणूक आयोग आपल्या या निर्णयावर ठाम आहे.

No PM Narendra Modi biopic release before May 19: Election Commission tells Supreme Court | PM Narendra Modi biopic: निवडणूक आयोग म्हणते, हे बायोपिक नाही तर हेजियोग्राफी!!

PM Narendra Modi biopic: निवडणूक आयोग म्हणते, हे बायोपिक नाही तर हेजियोग्राफी!!

ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट गत ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता.

विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे सध्या तरी दूर होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. चित्रपट पाहिल्यानंतर निवडणूक आयोग आपल्या या निर्णयावर ठाम आहे. हे बायोपिक नसून हेजियोग्राफी (संतचरित्र) आहे, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट मत आहे.
गत १७ एप्रिलला निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट बघितला. चित्रपट पाहिल्यानंतर गत २२ एप्रिलला आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे याबद्दलचा सीलबंद अहवाल सोपवला. आपल्या या अहवालात आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिलेल्या स्थगितीचे समर्थन केले आहे. लोकसभा निवडणुका संपल्याशिवाय या चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी देता येणार नाही,असे स्पष्ट मत आयोगाने नोंदवले आहे. 


टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक कमी आणि एक संतचरित्र अधिक वाटतो, असे आयोगाने सर्वोच्च न्यायालयास सोपवलेल्या अहवालात म्हटले आहे. निवडणूक अचारसंहितेच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास निवडणूक संतुलन बिघडेल आणि संबंधित पक्षाला राजकीय लाभ मिळेल. त्यामुळे १९ मे पूर्वी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी देता येणार नाही, यावर आयोगाने जोर दिला आहे. या अहवालानुसार, या बायोपिकमध्ये पीएम मोदींबद्दल सकारात्मक बाबी दाखवताना विरोधकांना नकारात्मकरित्या सादर केले आहे. विरोधी पक्ष नेत्यांची खरी ओळख पटेल,अशापद्धतीने त्यांना चित्रपटात दाखवण्यात आले आहे. १३५ मिनिटांचा हा चित्रपट एका व्यक्तिचे महिमामंडन आहे. सरतेशेवटी हा चित्रपट या व्यक्तिला संताचा दर्जा प्रदान करतो.
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट गत ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण निवडणूक आयोगाच्या या ताज्या अहवालानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: No PM Narendra Modi biopic release before May 19: Election Commission tells Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.