​ ‘शोरगुल’ वादात; जिम्मी शेरगिलविरोधात फतवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2016 04:29 PM2016-06-23T16:29:58+5:302016-06-23T21:59:58+5:30

देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा ‘शोरगुल’ वादात सापडला आहे. या चित्रपटात काम केले म्हणूल अभिनेता जिम्मी शेरगिल याच्याविरूद्ध चक्क ...

'Noisy' promise; Fatwa against Jimmy Shergill | ​ ‘शोरगुल’ वादात; जिम्मी शेरगिलविरोधात फतवा

​ ‘शोरगुल’ वादात; जिम्मी शेरगिलविरोधात फतवा

googlenewsNext
शातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा ‘शोरगुल’ वादात सापडला आहे. या चित्रपटात काम केले म्हणूल अभिनेता जिम्मी शेरगिल याच्याविरूद्ध चक्क फतवा जारी करण्यात आला आहे.  या चित्रपटावर उत्तर प्रदेशमध्ये बंदी घालण्यात आल्याचीही माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे. चित्रपटाचे निमार्ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून चित्रपटावरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ‘शोरगुल’ हा चित्रपट देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा असून, चित्रपटाच्या कथेला मुझफ्फरनगर येथे २०१३ साली घडलेल्या दंगलीचीही किनार आहे. चित्रपटात मुस्लीम धमीर्यांची भावना दुखावण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा खमान पीर बाबा समितीने केला असून, अभिनेता जिम्मी शेरगिलविरोधात निषेधाचा फतवाच जारी केला आहे. चित्रपटात जिम्मी शेरगिलसोबत चित्रीत करण्यात आलेले काही सीन मुस्लीम धमीर्यांच्या भावना दुखावणारे असल्याचे या समितीचे म्हणणे आहे.  

Web Title: 'Noisy' promise; Fatwa against Jimmy Shergill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.