Nora Fatehi Video: “क्या बोल रही है छोरी...?”, चुकून असं काही बोलून गेली नोरा की नेटकऱ्यांना हसू आवरेना...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 10:47 AM2023-01-20T10:47:35+5:302023-01-20T10:47:42+5:30
Nora Fatehi Video: आपल्या शानदार डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा फतेही सध्या महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे चर्चेत आहे. पण सध्या त्या प्रकरणाची नाही तर नोराच्या एका ताज्या व्हिडीओची चर्चा आहे.
Nora Fatehi Video: आपल्या शानदार डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा फतेही सध्या महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे चर्चेत आहे. पण सध्या त्या प्रकरणाची नाही तर नोराच्या एका ताज्या व्हिडीओची चर्चा आहे. होय, नोराच्या तोंडून चुकून असं काही बाहेर पडलं की, नेटकरी तिची मजा घेत आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने नोराचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर नोरा दिसताच पापाराझी तिच्याभोवती गर्दी करतात. यात नोराचा एक क्रेझी फॅनही या गर्दीत शिरतो. नोराला फोनमध्ये कैद करण्याच्या गडबडीत हा फॅन खाली पडतो. त्याला पडताना पाहून नोरा काहीशी टेन्शनमध्ये येते. ती त्याची मदत करण्याचा प्रयत्न करते. आता यात ट्रोल करण्यासारखं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर खरी गंमत पुढे आहे. त्या चाहत्याची मदत करत असताना संभल के गिरो..., असं नोरा म्हणते. तुमच्या लक्षात आलं असेलच... तर नेमक्या याच वाक्यावरून लोक नोराची मजा घेत आहेत.
भाई, संभल के गिरो यार..., असं एका युजरने नोराची खिल्ली उडवताना लिहिलं आहे. भाई संभल के गिर, लेकिन गिर जरूर..., असं एकाने लिहिलं आहे. संभल के गिरो भाई, आधी थोडी प्लानिंग कर, पडल्यावर किती इजा करून घ्यायची, हे ठरव आणि मग पड... असं कोण पडतं यार....., अशा शब्दांत एका युजरने नोराची मजा घेतली आहे. क्या बोलती है ये छोरी, असं एका युजरने म्हटलं आहे. मॅडम, संभल के कैसे गिरते है बतायें जरा, अशी कमेंट एका युजरने केली.
एकंदर काय तर या व्हिडीओवरून चाहत्यांनी नोराची चांगलीच मजा घेतली. नोराला हिंदी फार काही नीट येत नाही, हे सगळ्यांना ठाऊक आहे. साहजिक ती जे काही बोलली ती अजानतेपणाने. पण तिच्या बोलण्याने चाहत्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं, हे नक्की.