Then & Now : इतकी बदलली नोरा फतेही, हे जुने फोटो पाहाल तर विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 05:00 PM2021-09-21T17:00:07+5:302021-09-21T17:01:59+5:30
Nora Fatehi : कधीकाळी पोट भरण्यासाठी ती कॉफी शॉपमध्ये काम करायची. टेलीकॉलरची नोकरीही तिने केली.
नोरा फतेहीला (Nora Fatehi ) आज कोण ओळखत नाही? आपल्या डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी जागा निर्माण करणा-या नोराचे आज जगभर चाहते आहेत. अगदी बॉलिवूडच्या बेस्ट डान्सरच्या यादीत तिचं नाव घेतलं जातं. आपल्या मादक अदांनी चाहत्यांना वेड लावणारी नोरा तिच्या ग्लॅमरस लुकमुळेही चर्चेत असते. गेल्या काही वर्षांत तिच्या प्रचंड बदल झाला आहे. काही वर्षांआधीचे तिचे फोटो पाहाल तर तुम्हीही तिला ओळखू शकणार नाही, इतकी ती बदलली आहे.
बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला. स्ट्रगलिंगच्या दिवसांत नोरा पेइंग गेस्ट म्हणून राहायची. या काळात हिंदी बोलता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
ऑडिशन दरम्यान हिंदी न येत असल्यामुळे तिची खिल्ली उडवली जायची. अनेक वेळा ऑडिशन देऊन घरी परतल्यावर ती रडायची.
नोरा जेव्हा कॅनडाहून भारतात आली होती तेव्हा, तिच्याकडे फक्त 5000 रुपये होते. कधीकाळी पोट भरण्यासाठी ती कॉफी शॉपमध्ये काम करायची. टेलीकॉलरची नोकरीही तिने केली. या नोकरीत ती लॉटरीची तिकिटे विकायची.
नोराने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘बिग बॉस 9’मध्ये एक स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली. यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
2014 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, नोरा फक्त नृत्यातच नाही तर मार्शल आर्टस् मध्येही पारंगत आहे. सत्यमेव जयते, स्ट्रीट डान्सर 3 डी, भारत, भुज-द प्राईड ऑफ इंडिया अशा सिनेमात तिने काम केले आहे.