Nora Fatehi : प्यार में धोखा...! ब्रेकअपबद्दल बोलताना नोरा फतेहीला अश्रू अनावर...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 02:55 PM2022-11-27T14:55:36+5:302022-11-27T14:57:25+5:30
Jhalak Dikhla Jaa 10: श्रितीने ‘बडा पछताओगे’ या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तिचा डान्स पाहून नोरा भारावून गेली आणि अचानक तिला अश्रू अनावर झाले.
नोरा फतेही (Nora Fatehi ) हा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची सर्वात बेस्ट डान्सर्स आहेत. सध्या ती ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhla Jaa 10 ) हा रिअॅलिटी शो जज करत आहेत. याच शोमध्ये नोराने अशी काही गोष्ट सांगितली की, ती ऐकून सगळेच भावुक झालेत. नोराच्या डोळ्यांत तर अश्रू तरळले. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये नोरा तिच्या प्रेमभंगाबद्दल बोलली.
श्रितीने ‘बडा पछताओगे’ या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तिचा डान्स पाहून नोरा भारावून गेली आणि अचानक तिला अश्रू अनावर झाले. हे गाणं नोरावर चित्रित झालं आहे. हे गाणं आणि प्रेमभंग असं सगळं बोलताना नोराला इमोशनल झाली. ‘ हे माझं गाणं आहे आणि या गाण्याशी माझ्या भावना जुळलेल्या आहेत. हे गाणं शूट झालं, त्यावेळी मी पर्सनल लॉसमधून जात होते. त्या सगळ्या भावना घेऊनच मी सेटवर जायचे,’असं नोरा म्हणाली. हे सांगताना तिला अश्रू अनावर झालेत.
‘बडा पछताओगे’ हे गाणे प्रेमभंगावर आधारित आहे. नोरा फतेही त्यावेळी अंगद बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण अचानक दोघांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपनंतर नोरा काही काळ डिप्रेशनमध्ये गेली होती.
एका टॉक शोमध्ये ती याबद्दल बोलली होती. त्या दिवसांत मी डिप्रेशनमध्ये गेले होते. माझी काम करण्याची इच्छा संपली होती. त्या दोन महिन्यांत मी खूप काही भोगलं. एकदा भारत या सिनेमासाठी ऑडिशन देत असताना मी ढसाढसा रडले होते. पण नंतर मी ठरवलं आणि पुन्हा उठून उभे झाले. अर्थात त्या सर्व गोष्टींनी मला कायमच बदललं, पण आता मी आनंदी आहे, असं ती म्हणाली होती.
नोरा व अंगद यांनी कधीच आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली नाही. आता अंगदने नेहा धुपियाशी लग्न केलं असून त्याला दोन मूलं आहेत.