Nora Fatehi-Jacqueline Fernandez: नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर केला मानहानीचा दावा, आता होणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 16:11 IST2023-01-21T16:10:49+5:302023-01-21T16:11:26+5:30
गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.

Nora Fatehi-Jacqueline Fernandez: नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर केला मानहानीचा दावा, आता होणार...
गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. या प्रकरणी नोराने जॅकलीन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नोरा फतेहीच्या बदनामीच्या तक्रारीवर २५ मार्चला सुनावणी निश्चित केली आहे. या प्रकरणात तिचे नाव चुकीच्या पद्धतीने ओढण्यात आल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.
अभिनेत्री नोरा फतेहीने अलीकडेच जॅकलिन फर्नांडिस आणि विविध माध्यम संस्थांविरोधात दिल्ली न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात आपले नाव जबरदस्तीने आणण्यात आल्याचा दावा नोराने तक्रारीत केला आहे. तिचा सुकेशशी काहीही संबंध नाही. नोराने सांगितले की, ती सुकेशला त्याची पत्नी लीना मारिया पॉस यांच्यामुळेच ओळखत होती.
The Patiala House Court of Delhi lists the hearing on a defamation complaint filed by Bollywood actor Nora Fatehi for March 25, 2023. Nora recently filed a defamation suit against Jacqueline Fernandez and various media organisations in Delhi Court.
— ANI (@ANI) January 21, 2023
(File photo) pic.twitter.com/3YNGWBG775
मात्र, नोराच्या तक्रारीनंतर जॅकलिन फर्नांडिस काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी अभिनेत्री जॅकलिनचे वकील प्रशांत पाटील यांनी नोराचा काही गैरसमज झाल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. यासोबतच त्यांनी नोराचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर जॅकलिनच्या वकिलांनी असेही म्हटले की, जॅकलिन गरज पडल्यास कायदेशीररित्या नोराविरुद्ध मानहानीचा खटलाही दाखल करू शकते.
सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची अनेकदा चौकशी केली आहे. ज्यामध्ये नोराने तिची बाजू स्पष्टपणे मांडली होती. मात्र नंतर जॅकलिन फर्नांडिस आणि मीडिया ट्रायलमुळे तिची प्रतिमा डागाळल्याचा आरोप नोरा फतेहीने केला आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरण्यात आल्याचा दावा नोराने केला आहे.