Nora Fatehi Net Worth : एका आयटम सॉंगसाठी नोरा फतेही किती घेते मानधन? जाणून घ्या तिची नेटवर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:56 PM2022-06-13T16:56:38+5:302022-06-13T16:57:07+5:30

Nora Fatehi Net Worth : आज नोरा आयटम नंबरसाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या डान्सर्सपैकी एक  बनली आहे. अशात नोरा फतेहीची नेटवर्थ आज किती आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी किती पैसे चार्ज करते.

Nora Fatehi net worth song fees annual income car collection | Nora Fatehi Net Worth : एका आयटम सॉंगसाठी नोरा फतेही किती घेते मानधन? जाणून घ्या तिची नेटवर्थ...

Nora Fatehi Net Worth : एका आयटम सॉंगसाठी नोरा फतेही किती घेते मानधन? जाणून घ्या तिची नेटवर्थ...

googlenewsNext

Nora Fatehi Net Worth: नोरा फतेही बॉलिवू़डमधील सर्वात चांगल्या डान्सर्सपैकी एक मानली जाते. अनेक टीव्ही शोज, म्युझिक व्हिडीओ आणि सिनेमात ती दिसते. नोराने जितकीही गाणी केली ती सगळी सुपरहिट झाली.  ज्यात 'मनोहरी', 'दिलबर', 'कमरिया', 'एक तो कम ज़िंदगानी', 'साकी-साकी', 'कुसू-कुसू' आणि 'हाय गर्मी' यांचा समावेश आहे. सध्या ती टीव्ही शोमध्ये जज आहे.

आज नोरा आयटम नंबरसाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या डान्सर्सपैकी एक  बनली आहे. अशात नोरा फतेहीची नेटवर्थ आज किती आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी किती पैसे चार्ज करते.

बॉलिवूडमध्ये सध्या नोरा फतेहीची बरीच डिमांड वाढली आहे. आयटम सॉंगसाठी अनेक निर्माते तिला संपर्क करत असतात. रिपोर्ट्सनुसार, नोरा एक गाणं करण्यासाठी 50 लाख रूपये चार्ज करते. तर सिनेमात काम करण्यासाठी ती 1 कोटी रूपये इतकं मानधन घेते. तसेच जाहिराती आणि सोशल मीडियावरून ती महिन्याला 25 लाख रूपये कमाई करते.

नोराकडे अनेक महागड्या कार्स आहेत. यात 62 लाख रूपयांची BMW 5 20D आणि 37 लाख रूपयांची मर्सीडिज बेंझ तसेच 15.24 लाखांची होंडा सिटी आणि 9 लाख रूपयांची व्होल्क्सवॅगन कार यांचा समावेश आहे. 

नोरा फतेहीने हिंदीसहीत तेलुगु, मल्याळम, तमिळ भाषेतील सिनेमातही काम केलं आहे. तिला इंडस्ट्रीत आता 10 वर्ष झाली आहेत. या दरम्यान तिने चांगली कमाई केली.  आज नोराची नेटवर्थ 30 कोटी रूपये आहे. 

Web Title: Nora Fatehi net worth song fees annual income car collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.