"इतकी लाज नको घालवू", Dance Meri Raniमध्ये नोराने शकीराला केलं कॉपी अन् झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:44 PM2021-12-21T17:44:38+5:302021-12-21T17:50:09+5:30

गाण्यात नोरा (Nora Fatehi) ब्लॉन्ड केस आणि बेज कलरच्या बिकिनीमध्ये दिसतं आहे.

Nora fatehi turns desi shakira in dance meri rani song users troll nora fatehi | "इतकी लाज नको घालवू", Dance Meri Raniमध्ये नोराने शकीराला केलं कॉपी अन् झाली ट्रोल

"इतकी लाज नको घालवू", Dance Meri Raniमध्ये नोराने शकीराला केलं कॉपी अन् झाली ट्रोल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. नोरा अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरही आहे. आपले डान्सचे व्हिडीओ शेअर करत ती तिच्या फॅन्सचं मनोरंजनही करते.  नोरा फतेहीचा 'डान्स मेरी रानी' हा नवीन म्युझिक व्हिडिओ २१ डिसेंबरला रिलीज झाला आहे. हे गाणे गुरु रंधावाने गायले आहे आणि संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होतो आहे.

गाण्यात नोरा ब्लॉन्ड केस आणि बेज कलरच्या बिकिनीमध्ये दिसतं आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही ती आपल्या डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर नोरा फतेहीचा हा लूक हॉलिवूड गायिका शकीरासारखाच आहे. लोकांनी गाण्याला लाईक करण्यासोबतच नोराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यात नोरा शकिराप्रमाणे डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.

नोरा शकीराच्या 'हिप्स डोंट लाय' आणि 'व्हेनवर वेयर नेव्हर' या गाण्यांमधील स्टेप्स कॉपी करताना दिसतेय.  गाण्याच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "अरे, तू शकीराची हेअरस्टाइल कॉपी केली आहेस, किमान ड्रेसची कॉपी करू नकोस, यार, हा खूप मोठा अपमान आहे." दुसर्‍या युजरने शकिराच्या पालिका बाजार अशी कमेंट केली. आणखीन एका यूजरने लिहिले, "टोनी कक्कर आणि शकीराचे रिमिक्स."

नोरा फतेही आणि गुरु रंधावाने 'नच मेरी रानी' या म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले होते. हे गाणे बऱ्यापैकी हिट झाले होते. नोराने अलीकडेच UAE मध्ये Vidcon कॉन्सर्टमध्ये भाग घेतला होता. 

Web Title: Nora fatehi turns desi shakira in dance meri rani song users troll nora fatehi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.