नोरा फतेही या सिनेमात दिसणार बोल्ड लूकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 19:44 IST2019-12-25T19:43:31+5:302019-12-25T19:44:05+5:30
आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

नोरा फतेही या सिनेमात दिसणार बोल्ड लूकमध्ये
आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. आता ती स्ट्रीट डान्सर चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबाबत ती खूपच उत्सुक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसुझानं केलं आहे. या चित्रपटातील डान्सलाच फक्त महत्त्व नसून कलाकारांच्या लूकवरही विशेष मेहनत घेण्यात आली आहे.
स्ट्रीट डान्सर चित्रपटातील नोराची भूमिका महत्त्वपूर्ण असून ती डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने खूप स्ट्राँग व कॉन्फिडंस असणाऱ्या तरूणीची भूमिका यात साकारली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे तिचा लूक डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे नोराच्या पात्राला एक स्वॅग व एडिड्युड प्राप्त झाला आहे.
स्ट्रीट डान्सर चित्रपटात नोरा लंडनमध्ये लहानाची मोठी झालेल्या भारतीय तरूणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही तरूणी स्पोर्टी व बोल्ड आहे. तिला स्वतःवर पूर्ण विश्वास असतो. या चित्रपटात ती बोल्ड लूकसोबत लाल रंगाच्या हेअर कलरमध्ये दिसणार आहे.
नोरा फतेहीला बालपणापासून डान्सवर आधारीत चित्रपटात काम करायचं होतं आणि अखेर तिचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. तिने या चित्रपटातील भूमिकेसाठी खूप मेहनत देखील घेतली आहे. तिने या चित्रपटातील लूकसाठी स्वतः जातीनं लक्ष दिलं आहे.
ती स्वतः डिझायनरसोबत बसून तिने स्वतःचा लूक व कपड्यांवर विशेष मेहनत घेतली आहे.