आमिर खान नाही तर शाहरुख खान असता लाल सिंग चड्ढा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 04:36 PM2022-08-13T16:36:51+5:302022-08-13T16:37:27+5:30

Laal Singh Chaddha: आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून या चित्रपटाची सातत्याने चर्चा होताना दिसते आहे.

not Aamir Khan but Shah Rukh Khan could hav been Laal Singh Chaddha, but... | आमिर खान नाही तर शाहरुख खान असता लाल सिंग चड्ढा, पण...

आमिर खान नाही तर शाहरुख खान असता लाल सिंग चड्ढा, पण...

googlenewsNext

आमिर खान(Aamir Khan)चा 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट सतत चर्चेत येतो आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच आमिर विरोधात दिल्ली पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. त्याच्या चित्रपटावर सतत बहिष्कार घालण्याची चर्चा (#BoycottLaalSinghCaddha) रिलीज होण्यापूर्वीच सुरू आहे. दिग्दर्शक अद्वैत चंदनच्या या चित्रपटात शाहरुख खानने केमिओ केला आहे. शाहरुखच्या छोट्याशा भूमिकेचीही खूप चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहीतीये का की, काही वर्षांपूर्वी शाहरुख 'लाल सिंग चड्ढा' बनणार होता?

'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचे हक्क मिळवणे त्याच्यासाठी आणि त्याच्या टीमसाठी किती कठीण होते हे आमिर खानने अनेकदा सांगितले आहे. करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण ७' मध्ये आमिर खानने सांगितले की, या चित्रपटाची योजना करायला त्याला सात वर्षे लागली. अभिनेता अतुल कुलकर्णीने दोन आठवड्यात चित्रपटाची पटकथा लिहिली असल्याचेही त्याने सांगितले. पण 'फॉरेस्ट गंप'च्या रिमेकचा हिरो शाहरुख खान असणार होता हे फार कमी लोकांना माहीत आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, नव्वदच्या दशकापासून फरेस्ट गंप या क्लासिक चित्रपटाचा रिमेक बनवण्याची संधी बॉलिवूडमध्ये शोधली जात होती. 'कभी हा कभी ना' चित्रपटाचे दिग्दर्शक कुंदन शाह यांनी शाहरुख खानला टॉम हँक्सच्या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची ऑफर दिली होती. पण त्यावेळी चित्रपटाचे हक्क मिळणे ही खूप मोठी आणि अवघड बाब होती. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांना काही आवश्यक बदल करावे लागले, असेही म्हटले जात आहे.


खरं तर, कुंदन यांनी सर्वप्रथम अनिल कपूरला फॉरेस्ट गंपच्या हिंदी रिमेकची ऑफर दिली. मात्र, क्रिएटिव्ह फरकामुळे अनिल कपूरने ते सोडले. यानंतर कुंदन शाह शाहरुख खानपर्यंत पोहोचले. पुढे प्रोडक्शनच्या अडचणींमुळे हा चित्रपट रखडला आणि बॉलिवूडचे हे मोठे स्वप्न अधुरेच राहिले. अलीकडेच 'लाल सिंह चड्ढा'चे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी खुलासा केला होता की, त्यांनी हा रिमेक बनवण्याची कल्पना दिग्दर्शक कुंदन शाह यांना दिली होती. हा चित्रपट जरी ९० च्या दशकात बनला नसला तरी आता आमिर खानने निर्मिती करून चर्चेत आला आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा केमिओलाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

Web Title: not Aamir Khan but Shah Rukh Khan could hav been Laal Singh Chaddha, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.