'गदर'मध्ये अमिषा पटेल नाही तर या अभिनेत्रींना निर्मात्यांनी केलं होतं अप्रोच, मग घडलं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 18:38 IST2024-07-22T18:37:12+5:302024-07-22T18:38:04+5:30
Gadar Movie : सनी देओलचा 'गदर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात तारा सिंग आणि सकिना यांची जोडी खूप आवडली होती. पण तुम्हाला माहित आहे का की सकीनाच्या भूमिकेसाठी अमिषा पटेल ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.

'गदर'मध्ये अमिषा पटेल नाही तर या अभिनेत्रींना निर्मात्यांनी केलं होतं अप्रोच, मग घडलं असं काही
सनी देओल(Sunny Deol)चा गदर (Gadar Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला. २२ वर्षांनंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग आणला आणि सीक्वलनेदेखील बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. तारा सिंग आणि सकीना या जोडीने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकण्यात यश मिळवले. गदर २ ने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाची स्पर्धा शाहरुख खानच्या पठाणसोबत होती. गदर २ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. अमिषा पटेल(Amisha Patel)ने सकीना बनून लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. पण तुम्हाला माहित आहे का की सकीनाच्या भूमिकेसाठी अमिषा पटेल ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.
सकीनाच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधण्यात आला होता. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी बॉलिवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत एकदा खुलासा केला होता की सनी देओलच्या विरुद्ध भूमिका करण्यासाठी त्यांनी दोन अभिनेत्रींना संपर्क केला होता.
या अभिनेत्रींना सकीनाच्या भूमिकेसाठी केलं होतं अप्रोच
अनिल शर्मा यांनी सांगितले होते की, मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांनी ऐश्वर्या राय बच्चन आणि काजोलशी संपर्क साधला होता. सकीनाच्या भूमिकेसाठी त्यांना काही लोकप्रिय चेहरे हवे होते. त्यात ऐश्वर्या आणि काजोलही होत्या. या चित्रपटाची स्क्रिप्टही त्यांनी अनेक अभिनेत्रींना सांगितली. काही अभिनेत्रींनी या भूमिकेसाठी रस दाखवला होता तर काहींनी नकार दिला होता. शेवटी, अनिल यांनी सांगितले की त्यांना एक लोकप्रिय अभिनेत्री आणि अमरीश पुरी यापैकी एकाची निवड करायची होती, म्हणून त्यांनी अमरीश पुरी यांना चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अमिषा पटेलला प्रमुख स्त्रीसाठी कास्ट केले. अमरीश पुरी यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती.