काजोल, राणी, माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत केले सर्वाधिक चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:33 IST2023-11-30T18:27:38+5:302023-11-30T18:33:59+5:30
सुपरस्टार शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर अनेक बॉलिवूड सुंदरींसोबत रोमान्स केला आहे.

काजोल, राणी, माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत केले सर्वाधिक चित्रपट
सुपरस्टार शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर अनेक बॉलिवूड सुंदरींसोबत रोमान्स केला आहे. शाहरुखने काजोल, राणी मुखर्जी आणि माधुरी दीक्षित नाही तर जुही चावलासोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
शाहरुख खान आणि जुही चावला यांनी पहिल्यांदा 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'राजू बन गया जेंटलमन' चित्रपटात काम केले होते. शाहरुख खानने 1993 मध्ये रिलीज झालेल्या 'डर'मध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती, जो जुहीच्या प्रेमात वेडा होता. यानंतर 1995 मध्ये जुही चावला आणि शाहरुख खानने 'राम जाने'मध्ये एकत्र काम केले होते. तसेच 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'येस बॉस'मध्ये हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले होते.
1998 मध्ये शाहरुख खानचा 'डुप्लिकेट' चित्रपट रिलीज झाला होता, ज्यामध्ये जुही चावला देखील दिसली होती. यात किंग खानने दुहेरी भूमिका साकारली होती. याशिवाय 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'मध्येही दोघे एकत्र दिसले होते. हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर 2001 मध्ये शाहरुख आणि जुहीने 'वन टू का फोर'मध्ये काम केले. इतकेच नाही तर जुही आणि शाहरुख खान यांनी 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'भूतनाथ'मध्येही एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली होती.
किंग खान आणि जुही चावला यांच्या जोडीने जवळपास 30 वर्षे पडद्यावर अधिराज्य गाजवले. शाहरुख खानसोबत जास्त चित्रपट करणाऱ्या जुही चावलानंतर काजोल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 'बाजीगर', 'करण अर्जुन', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान', 'दिलवाले' यांचा समावेश आहे.