लग्नाच्या चर्चेवर Kajol ची बहीण Tanishaa Mukerji ने सोडले मौन, त्या फोटोमागचे सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:30 PM2022-01-06T13:30:26+5:302022-01-06T13:31:20+5:30

'बिग बॉस 7' ( Bigg Boss &) शोमध्ये तिच्या आणि अरमान मलिकच्या (Arman Malik) कथित रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र अरमान आपला चांगला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तनिषाने केला.

Not married yet ! Kajol's Sister Tanishaa Mukerji quashes secret wedding rumours | लग्नाच्या चर्चेवर Kajol ची बहीण Tanishaa Mukerji ने सोडले मौन, त्या फोटोमागचे सांगितले कारण

लग्नाच्या चर्चेवर Kajol ची बहीण Tanishaa Mukerji ने सोडले मौन, त्या फोटोमागचे सांगितले कारण

googlenewsNext

काजोलची(Kajol) बहीण तनिषा मुखर्जी(Tanishaa Mukerji ) तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले होते, जे चर्चेला कारणीभूत ठरले. तिच्या त्या फोटोंवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.फोटोवरून तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिच्या या फोटोंवर नेटीझन्स तिला लग्नाबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावर आता अखेर तनिषाने मौन सोडले आहे. पायात जोडवे का घातले याचे कारणही तिने सांगितले आहे.तनिषा म्हणाली- मला पायाच्या बोटात तसेही अशाप्रकारचे आर्टीफिशल घालायला आवडतात.त्यामुळे पाय देखील खूप छान दिसतात. पायाला ते शोभून दिसत होते. म्हणून मी एक फोटो काढला आणि पोस्ट केला. 

याशिवाय दुसरे काही नाही. मला माझ्या फॅशन सेन्सबद्दल लोकांना सगळ्या गोष्टी साांगाव्या लागतील का? माझ्या लग्नावर अर्थातच प्रत्येकजण विचार करतो.जोपर्यंत एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले आहे. मात्र सध्या तरी आपण सिंगल आहोत हे सांगायलाही ती विसरली नाही.

 

लग्न झाल्यावर जगाला सांगेन, लपवून ठेवणार नाही. थाटामाटात लग्न करण्याची तिची ईच्छा आहे. मी अविवाहित आहे हे सर्व जगाला माहीत आहे. यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. मी अविवाहित असली आनंदी आहे. काजोलप्रमाणे तनिषाला फार काही यश मिळवता आले नाही. काही सिनेमात तिने काम केले. कधे आले आणि कधी गेले हेच कोणाला कळाले नाही. आज तनिषा इंडस्ट्रीपासून लांब आहे. कोणत्याही सिनेमात ती झळकलेली नाही. बॉलिवूडमध्ये तरी तनिषाचे करिअर फ्लॉप ठरले.सुरुवातील तनिषाने 'शूssss' या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले.

यानंतर 'बिग बॉस 7' ( Bigg Boss &) शोमध्ये तिच्या आणि अरमान मलिकच्या (Arman Malik) कथित रिलेशनशिपच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र अरमान आपला चांगला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तनिषाने केला होता. दोघांनीही जगासमोर आपलं नातं मान्य केलं होतं, पण काही काळानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.अखेर तनिषाचे लग्नाचे ‘अरमान’ अधुरेच राहिले.

Web Title: Not married yet ! Kajol's Sister Tanishaa Mukerji quashes secret wedding rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kajolकाजोल