आसारामच नव्हे तर सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा ‘हा’ गॅँगस्टरही आहे कारागृहात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 01:16 PM2018-04-05T13:16:06+5:302018-04-05T18:46:45+5:30

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच न्यायालयाने त्याच्या ...

Not only Asaram but also threatening to kill Salman is also a 'Gangster' in jail! | आसारामच नव्हे तर सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा ‘हा’ गॅँगस्टरही आहे कारागृहात!

आसारामच नव्हे तर सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा ‘हा’ गॅँगस्टरही आहे कारागृहात!

googlenewsNext
ळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच न्यायालयाने त्याच्या अटकेचे वॉरंट काढले. पोलिसांनी तातडीने कारवाई करताना त्याची रवानगी कारागृहात केली. सध्या सलमान खानला जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक नं. २ मध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी त्याच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त आहे. कारण या कारागृहात आसारामबापूंसह सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा कुख्यात गॅँगस्टर लॉरेंस बिश्नोई यालादेखील ठेवण्यात आले आहे. लॉरेंस बिश्नोईने काही दिवसांपूर्वीच जोधपूर न्यायालयाच्या आवारात सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कारागृहात सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, कारागृहात सलमानला आसारामबापूंच्या बॅरेक शेजारी असलेल्या एका बॅरेकमध्ये रात्र काढावी लागणार आहे. अल्पवयीन मुलीशी दुष्कर्म केल्याप्रकरणी आसारामबापू कारागृहात आहे. २०१३ मध्ये आपल्याच आश्रमातील एका अल्पवयीन मुलीशी आसारामने दुष्कर्म केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आसारामने याप्रकरणी बºयाचदा जामीन घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. विशेष म्हणजे आसारामने प्रकृतीचे कारण पुढे करत जामिनासाठी प्रयत्न केले, परंतु यातही तो यशस्वी ठरला नाही. 

लॉरेंश बिश्नोईबद्दल सांगायचे झाल्यास तो एक कुख्यात गॅँगस्टर असून, त्याच्यावर हत्या, वसूली, मारामारी, अवैद्य शस्त्रास्त्रांचा वापर आदी स्वरूपाचे पंजाब आणि हरियाणा राज्यात गुन्हे दाखल आहेत. लॉरेंस सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याच्यावर व्यापाºयाला धमकावून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वास्तविक त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, मी निर्दोष असल्याचे बºयाचदा सांगितले आहे. 

दरम्यान, एका सुनावणीसाठी जेव्हा सलमान जोधपूरच्या न्यायालयात हजर होता, त्याचवेळी लॉरेंस बिश्नोईला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्याने न्यायालयाच्या आवारातच सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता दोघेही एका कारागृहात बंद असल्याने सलमानच्या सुरक्षेबद्दल विशेष काळजी घेतली जात आहे. 

Web Title: Not only Asaram but also threatening to kill Salman is also a 'Gangster' in jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.