प्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कलाकारही ठरले वर्णभेदाचे बळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 10:08 AM2018-04-12T10:08:36+5:302018-04-12T15:38:50+5:30

देसी गर्ल प्रियांका चोप्राने नुकताच एक खुलासा करताना तिला वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला. तिच्याप्रमाणे या कलाकारांनाही वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे.

Not only Priyanka Chopra, but this 'Artist' also became a victim of apartheid! | प्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कलाकारही ठरले वर्णभेदाचे बळी!

प्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कलाकारही ठरले वर्णभेदाचे बळी!

googlenewsNext
न वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये वर्णभेदाचा सामना करावा लागला असल्याचा धक्कादायक खुलासा देसी गर्ल प्रियांका चोप्राने केल्याने, पुन्हा एकदा वर्णभेदाचा मुद्दा समोर आला आहे. वास्तविक प्रियांकाला वयाच्या बाराव्या वर्षीही अमेरिकेत वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. जेव्हा प्रियांका अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती, तेव्हा तिला ब्राउनी म्हणून चिडविले जायचे. आता पुन्हा एकदा प्रियांकाला त्याचा सामना करावा लागला. वास्तविक वर्णभेद हॉलिवूडमध्येच केला जातो असे नाही, तर बॉलिवूडमध्ये बºयाचशा कलाकारांना प्रियांकाप्रमाणे वर्णभेदाचा सामना करावा लागला, त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...

बिपाशा बसू
बॉलिवूडची ‘बिल्लो की रानी’ बिपाशा बसूलाही सुरुवातीच्या काळात वर्णभेदाचा सामना करावा लागला. मूळची पश्चिम बंगालची असलेल्या बिपाशाने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र तिला हा प्रवास एवढ्या सहजासहजी करता आला नाही. जेव्हा ती इंडस्ट्रीत आली होती, तेव्हा तिला ‘काली बिल्ली’ म्हणून चिडवले जायचे.

फ्रीडा पिंटो
‘स्लमडॉग मिलेनियर’ची अभिनेत्री फ्रीडा पिंटोलाही काहीसा असाच सामना करावा लागला. तिला एका जाहिरातीसाठी अ‍ॅप्रोच करण्यात आले होते. ही जाहिरात फेअरनेस क्रीमची होती. या जाहिरातीत तिला एका सावळ्या रंगाच्या मुलीची भूमिका साकारायची होती. जिचा क्रिम लावल्यानंतर रंग उजळतो. फ्रीडाने ही जाहिरात करण्यास नकार दिला होता. 

मनोज वाजपेयी
अभिनेता मनोज वाजपेयीला ‘जुबेदा’ या चित्रपटावेळी वर्णभेदाला बळी पडावे लागले. जेव्हा मनोजचा ‘जुबेदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा समीक्षकांनी त्याचे तोडभरून कौतुक केले होते. मात्र एकाने मनोज कुठल्याच अ‍ॅँगलने राजकुमार दिसत नसल्याची टीका केली होती. यामुळे मनोज दु:खी झाला होता. 

नंदिता दास
आपल्या अभिनयाने नंदिता दासने इंडस्ट्रीत स्वत:चा ठसा उमटविला आहे. मात्र तिलाही वर्णभेदाचा वेळोवेळी सामना करावा लागला आहे. नंदिताने म्हटले होते की, मला नेहमीच वर्णभेदाचा सामना करावा लागला. बºयाचशा लोकांनी म्हटले की, तिचा रंग सावळा आहे. जे इंडस्ट्रीसाठी योग्य बाब नाही. चित्रपटांवर तिच्या रंगाचा खूप परिणाम होऊ शकतो. 

नवाजुद्दीन सिद्दिकी
आपल्या ट्विट आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता ऋषी कपूरने नवाजला म्हटले होते की, तुला बॉलिवूडमध्ये कधीही अ‍ॅँकरिंग करण्याची संधी मिळणार नाही. कारण तुझी इमेज अभिनेत्याप्रमाणे नाही. तसेच तुझ्यात ती पात्रताही नाही. मात्र आज नवाजला इंडस्ट्रीत दमदार अभिनयासाठी ओळखले जात आहे. 

शहाना गोस्वामी 
‘रॉकआॅन, जश्न, ब्रेक के बाद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय करणाºया शहाना गोस्वामी हिलाही वर्णभेदाचा सामना करावा लागला. याबाबतचा धक्कादायक खुलासा करताना शहानाने म्हटले की, तिला तिच्या सावळ्या रंगामुळे एका निर्मात्याने नकार दिला होता. शहानाने सांगितले होते की, तिचा एक दिग्दर्शक मित्र चित्रपटाची निर्मिती करीत होता. या चित्रपटासाठी दोन अभिनेत्रींची आवश्यकता होती. दुसºया अभिनेत्रीसाठी माझी निवड केली होती. परंतु निर्मात्यांनी माझ्या सावळ्या रंगामुळे मला नकार दिला होता. 

धनुष
‘रांझणा’ या चित्रपटादरम्यान साउथ सुपरस्टार धनुषला वर्णभेदाचा सामना करावा लागला. या चित्रपटाच्या कास्टिंगवेळी दिग्दर्शक आनंद एल राय यांनी म्हटले होते की, हिरो गोरा आणि सुंदर असायला हवा. साउथमधील लोकांना कदाचित तुझ्यासारखा हिरो पसंत येत असेल. परंतु बॉलिवूडमध्ये गोरा रंगाचाच हिरो प्रेक्षकांना भावतो. 

तनिष्ठा चॅटर्जी 
‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या शोमध्ये तनिष्ठाची तिच्या वर्णावरून खिल्ली उडविण्यात आली होती. यावेळी तनिष्ठाने चॅनल आणि शोच्या निर्मात्यांना चांगलेच सुनावले होते. तसेच इंडस्ट्रीमधून अनेक सेलिब्रिटी तनिष्ठाच्या समर्थनार्थ पुढे आले होते. मात्र प्रेम चोपडा यास अपवाद होते. त्यांनी म्हटले होते की, प्रत्येकाला स्वत:वर हसायला शिकायला हवे. शाहरूख आणि सलमानही स्वत:ला जोक्स करतात. जर तू स्वत:वरील अशाप्रकारचे जोक्स सहन करू शकत नाहीस, तर तुला अशा शोमध्ये जाण्याचा अधिकार नाही. 

Web Title: Not only Priyanka Chopra, but this 'Artist' also became a victim of apartheid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.