ऋषी कपूर, इरफानच नाही तर या कलाकारांनी सुद्धा कॅन्सरमुळे केले जगाला अलविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:20 PM2020-04-30T16:20:51+5:302020-04-30T16:22:47+5:30
कॅन्सरमुळे बॉलिवूडने या आधीही बरेच कलाकार गमावले आहेत.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला. पाठोपाठ दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनीही जगाला अलविदा म्हटले. इरफान व ऋषी कपूर हे दोघेही कॅन्सरने ग्रस्त होते. इरफान न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरने आजारी होता. तर ऋषी कपूर ल्युकेमियाने ग्रस्त होते. दोन्ही अभिनेत्यांची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि दोघांनीही चाहत्यांचा निरोप घेतला.
कॅन्सरमुळे निधन झालेला इरफान खान व ऋषी कपूर पहिले कलाकार नाहीत. कॅन्सरमुळे बॉलिवूडने या आधीही बरेच कलाकार गमावले आहेत.
2017 मध्ये दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले होते. विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सर होता. ज्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात उपचार घेत होते.
1981 मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता. ज्यामुळे त्या बराच काळ हॉस्पिटलमध्ये होत्या. 1981 मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला.
एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना सुद्धा कॅन्सरची लढाई हारले होते. बराच काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये आपल्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.
बॉलिवूड अभिनेता फिरोज खान यांचेही कॅन्सरमुळेच निधन झाले होते. 2009 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते.
अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची बहीण सिंपल यांचही कॅन्सरमुळे निधन झाले होते. 3 वर्ष कॅन्सरशी लढल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये वयाच्या 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता.