रानू मंडल नव्हे तर ही आहे रेल्वे स्टेशनवरून थेट बॉलिवूडमध्ये पोहोचलेली पहिली प्लेबॅक सिंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 02:11 PM2019-09-15T14:11:40+5:302019-09-15T14:14:09+5:30
हिमेश रेशमियाने रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू मंडलला संधी दिली. तिच्याकडून एक नव्हे तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत. पण याआधी अशाच एका स्टेशनवर गाणा-या मुलीला मोठा ब्रेक मिळाला होता
हिमेश रेशमियाने रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू मंडलला संधी दिली. तिच्याकडून एक नव्हे तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत. पण याआधी अशाच एका स्टेशनवर गाणा-या मुलीला मोठा ब्रेक मिळाला होता आणि या ब्रेक देणा-या बॉलिवूड सेलिब्रिटीचे नाव होते, अनुराग कश्यप.
होय, रानू मंडल हिच्या आधी मुंबईच्या सायन स्टेशनवर गाणा-या 16 वर्षीय दुर्गाला अनुरागने ब्रेक दिला होता. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दुर्गा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर गाणी गात असे. ‘ गँग्स ऑफ वासेपूर’ या अनुरागच्या सिनेमासाठी दुर्गाने ‘दिल छीछालेदर’ हे गाणे गायले होते. या सिनेमातील हे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले होते.
मूळची आंध्रप्रदेशची रहिवासी असलेल्या दुर्गाला दोन लहान बहिणी आहेत. दुर्गाची स्टोरीही अगदी रानू सारखी होती. रानूला रेल्वे स्टेशनवर गाताना बघून एतींद्र चक्रवर्ती या तरूणाने तिचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून रानूला बॉलिवूडच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या. दुर्गाची स्टोरीही तशीच. निर्माता आनंद सुरपूर यांनी दुर्गातील टॅलेंट ओळखले होते. त्यांनी दुर्गाला घडवले.
दोन वर्षे तिच्यासोबत काम केले. दुर्गाचा एक अल्बमही त्यांनी रिलीज केला. याचदरम्यान संगीत दिग्दर्शिका स्रेहा खानवालकर याही दुर्गाच्या आवाजाने प्रभावित झाल्या होत्या होत्या. त्यांनीच अनुरागकडे दुर्गाची शिफारस केली होती. त्यानंतर अनुरागने गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात दुर्गाला संधी दिली होती.
दुर्गाच्या आवाजातील ‘दिल छिछालेदर’ हे गाणे 4 ते 5 दिवसांत रेकॉर्ड झाले होते.