सलमान नाही तर 'ही' व्यक्ती सर्वात आधी पोहचली हॉस्पिटलमध्ये, अर्पिताला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 15:54 IST2019-12-27T15:49:36+5:302019-12-27T15:54:30+5:30
अर्पिताने मुलीचे नाव आयत असे ठेवले आहे. तसेच आयुष शर्मा आणि अर्पिताने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सलमान नाही तर 'ही' व्यक्ती सर्वात आधी पोहचली हॉस्पिटलमध्ये, अर्पिताला दिली भेट
सलमानच्या वाढदिवस ख-या अर्थाने स्पेशल बनला आहे. कारण भाईजानची बहिण अर्पिताने दु-यांदा आई झाली आहे. अर्पिताने एका गोंडस परीला जन्म दिला आहे. खुद्द अर्पितानेच सोशल मीडियावर मुलीच्या जन्माची गुड न्यूज शेअर केली आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाने खान आणि शर्मा कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.मुलीचा जन्म होताच हॉस्पिटमलमध्ये सगळ्यात आधी पोहचल्या हेलन, अर्पिताची भेट घेतली.
आता हळुहळु सगळे मित्र मंडळी हॉस्पिटलमध्ये अर्पिता आणि बाळाला भेटायला जाणार मात्र सलमान खानने अजूनतरी बहिण अर्पिताची भेट घेतलेली नाही. त्यामुळे सलमान कधी अर्पिताला भेटणार आणि बाळाचा पहिली झलक चाहत्यांना दाखवणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. तुर्तास अर्पिताने मुलीचे नाव आयत असे ठेवले आहे. तसेच आयुष शर्मा आणि अर्पिताने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी प्रसार माध्यमांचे देखील आभार मानले आहेत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शर्मासोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. मुळात सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे आता अहिलनंतर मामा सलमानचे अर्पिताच्या मुलीचे बॉन्डींग कसे बनणार हे ही पाहणे रंजक असणार आहे.