ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या प्रमोशनची अशी असणार स्ट्रॅटजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:28 PM2018-09-15T14:28:24+5:302018-09-15T14:29:31+5:30

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे सगळ्यांना वाटत आहे. पण या चित्रपटाचा ट्रेलर नव्हे तर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची चर्चा आहे.

Not Teaser But Makers To Come First With 6 Motion Posters for Thugs Of Hindostan? | ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या प्रमोशनची अशी असणार स्ट्रॅटजी

ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या प्रमोशनची अशी असणार स्ट्रॅटजी

googlenewsNext

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट लार्जर दॅन लाइफ असावा यासाठी यशराज फिल्म्स प्रोडक्शन प्रचंड प्रयत्न करत आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोघे अनेक वर्षं बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग असले तरी त्यांनी कधीच एकत्र चित्रपटात काम केले नव्हते. पण या दोन दिग्गज कलाकारांना या चित्रपटाद्वारे यश राजने एकत्र आणले आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे सगळ्यांना वाटत आहे. पण या चित्रपटाचा ट्रेलर नव्हे तर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. या मोशन पिक्चरद्वारे चित्रपटातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जाणार आहे. हे पोस्टर पुढील आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे कळतेय. प्रत्येक व्यक्तिरेखेचे वेगळे पोस्टर असून ते वेगवेगळ्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येईल अशी चर्चा आहे. या चित्रपटात सहा कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याने सहा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येतील असे म्हटले जात आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी या पोस्टरद्वारे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी अधिकाधिक उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या टीमकडून केला जाणार आहे. 

ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटानच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. या चित्रपटातील फँटसी, अॅक्शन हे प्रेक्षकांना खरेखुरे वाटावे यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रयत्न केले आहेत. आजवर बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याच आऊटडोर चित्रीकरणाला इतका पैसा वापरण्यात आलेला नव्हता असे म्हटले जाते.  

Web Title: Not Teaser But Makers To Come First With 6 Motion Posters for Thugs Of Hindostan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.