‘नोटबुक’चे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित, भावूक करेल लव्हस्टोरी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:05 IST2019-03-07T15:04:31+5:302019-03-07T15:05:32+5:30
सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित झालेय. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, अभिनेता जहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री.

‘नोटबुक’चे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित, भावूक करेल लव्हस्टोरी!!
सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित झालेय. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, अभिनेता जहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री. जहीर व प्रनूतन यांचा हा पहिला चित्रपट आहे. साहजिकच, दोघांकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. ‘लैला’ हे गाणे बघता, या अपेक्षांवर जहीर व प्रनूतन अगदी खरे उतरलेत, असे म्हणायला हरकत नाही.
‘लैला’चे बोल सुरुवातीलाच मनाचा ठाव घेतात. यानंतर फिरदौस (प्रनूतन) आणि कबीर (जहीर) यांची अदाकरी मन जिंकते.या रोमॅन्टिक पण दु:खाची किनार लाभलेल्या गाण्यात फिरदौस आपल्या प्रेमाची कबुली देतेय. अभेन्द्र उपाध्याय आणि विशाल मिश्रा यांनी या गाण्याला शब्दबद्ध केलेय. तर दिव्यानी भानुशालीने या गीताला स्वरसाज चढवलाय.
प्रनूतन ही अभिनेता मोहनीश बहलची मुलगी आहे तर एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी एकेकाळखी प्रख्यात अभिनेत्री नूतन यांची नात आहे. जहीरबद्दल सांगायचे तर तो सलमानच्या मित्राचा मुलगा आहे. एका पार्टीत सलमानने जहीरला पाहिले आणि त्याला चित्रपट आॅफर केला. कधीही एकमेकांना न भेटलेल्या पण प्रेमात पडलेल्या जोडप्याची कथा तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे काश्मिरमध्ये झाले आहे. येत्या २९ मार्चला ‘नोटबुक’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
पुलवामा हल्ल्यानंतर सलमानने या चित्रपटातील पाकिस्तानी सिंगर आतिफ असलमने गायलेले एक गाणे काढून टाकले होते. ‘मैं तारे’ नामक हे गाणे आता खुद्द सलमान गाणार आहे.