‘अब तो हमारे साथ भी अ‍ॅक्ट करलो’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2016 03:08 PM2016-10-06T15:08:27+5:302016-10-06T20:38:27+5:30

सलमान खानच्या चित्रपटातून नव्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पन करतात असे मानले जाते. मात्र आता सलमानला नव्या नायिकांसोबत नव्हे तर दीपिका ...

'Now also act with us' | ‘अब तो हमारे साथ भी अ‍ॅक्ट करलो’

‘अब तो हमारे साथ भी अ‍ॅक्ट करलो’

googlenewsNext
ong>सलमान खानच्या चित्रपटातून नव्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पन करतात असे मानले जाते. मात्र आता सलमानला नव्या नायिकांसोबत नव्हे तर दीपिका पादुकोन सोबत काम करायचे आहे. त्याने दीपिकाला ‘अब तो हमारे साथ अ‍ॅक्ट करलो’ अशी विनंती केली आहे.

सूंत्रानुसार बिग बॉसच्या शूटिंग दरम्यान त्याने ही विनंती केली. ‘बिग बॉस 10’च्या ओपनिंग एपिसोडमध्ये दीपिका सलमानसह दिसणार आहे. बिग बॉसच्या सेटवर आलेल्या पाहुण्याची मस्ती व सलमानने केलेली खिचाई सर्वांनाच भावते. ‘बिग बॉस 10’च्या ओपनिंग एपिसोडमध्ये दीपिका पादुकोन तिचा आगामी हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंडर केज’चे (xXx: The Return of Xander Cage) प्रमोशन करताना दिसेल. या चित्रपटातून दीपिका हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. 

यावेळी सेटवर दीपिकाने सलमान सोबत मस्ती केली. सलमाननेही तिने मिळविलेल्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. पण सलमानच तो, त्याने आपल्या खास शैलीत दीपिकाला ‘आता तरी माझ्यासोबत काम करशील ना’ अशी विनंती केली. दीपिकाला स्वत: सलमानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे सांगण्यात येते. किक व प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या नायिकांसाठी दीपिकाच्या नावाची चर्चा होती. मात्र दोन्ही वेळा तिचा नंबर लागला नाही. आता स्वत: सलमानने विनंती केल्यावर ही जोडी लवकरच पडद्यावर दिसेल असे दिसते.

बिग बॉसचा दहावा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान हा शो होस्ट करीत असल्याने या शोला चांगला टीआरपी मिळतो. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अनेक स्टार्स बिग बॉसमध्ये हजेरी लावतात. 

Web Title: 'Now also act with us'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.