आता अशी दिसते बाबूजी जरा धीरे चलो फेम याना गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 10:30 AM2018-03-19T10:30:50+5:302018-03-19T16:02:34+5:30
बाबूजी जरा धीरे चलो हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. या ...
ब बूजी जरा धीरे चलो हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. या गाण्यात प्रेक्षकांना याना गुप्ताला पाहायला मिळाले होते. यानाने या गाण्यात म्हशीवर बसून एंट्री घेतली होती. तिचा डान्स जबरदस्त हिट ठरला होता. याना या चित्रटानंतर अनेक चित्रपटांमध्ये झळकली. सर्वात शेवटी ती मर्डर २ या चित्रपटात झळकली होती. २०११ पासून याना चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. याना ही मुळची ब्रनोतील असून तिने सोळाव्या वर्षी तिच्या मॉडलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. जपानमध्ये देखील ती मॉडलिंग करत होती. त्यानंतर काही वर्षांनी ती भारतात आली. भारतात आल्यावर सुरुवातीचे काही वर्षं ती पुण्यातील ओशो आश्रम मध्ये राहात होती. तिने सत्यक गुप्तासोबत तिची ओळख झाली आणि काहीच वर्षांत त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. २००१ मध्ये त्यांचे लग्न झाले. पण लग्नानंतर काहीच वर्षांत म्हणजेच २००५ मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला.
२००१ मध्ये तिने भारतात मॉडलिंग करायला सुरुवात केली. तिला सुरुवातीच्याच काळात लॅकमेसारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी मॉडलिंग करण्याची संधी देखील मिळाली. किंगफिशरच्या महत्त्वाच्या मॉडेलपैकी ती एक मानली जात असे. २००३ या साली दम या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटातील बाबूजी जरा धीरे चलो या आयटम साँगमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिने काही वर्षांपूर्वी हाऊ टू लव्ह युअर बॉडी अँड गेट द बॉडी यू लव्ह हे पुस्तक देखील लिहिले होते. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या प्रसिद्धीनंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. झलक दिखला जा या कार्यक्रमात देखील ती झळकली होती. तसेच बिग बॉस ६ च्या फिनाले मध्ये देखील तिने परफॉर्म केले होते. २०११ नंतर ती मायदेशी परतली आणि आता तिने तिथे लग्न करून तिच्या आयुष्यात खूश आहे. याना आता खूप बदलली असून तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. यानाने आता बॉलिवूडला रामराम ठोकला आहे.