...आता काजोलही वाढविणार मॅडम तुसादची शान!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 12:33 PM2018-01-14T12:33:54+5:302018-01-14T18:03:54+5:30

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री काजोलची ‘स्वच्छ आदत स्वच्छ भारत’ या अभियानाची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. याबाबतची माहिती स्वत: ...

Now, Kajol is going to enhance the beauty of Madame Tussaud! | ...आता काजोलही वाढविणार मॅडम तुसादची शान!

...आता काजोलही वाढविणार मॅडम तुसादची शान!

googlenewsNext
ही दिवसांपूर्वीच अभिनेत्री काजोलची ‘स्वच्छ आदत स्वच्छ भारत’ या अभियानाची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. याबाबतची माहिती स्वत: काजोलनेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना दिली होती. आता तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. होय, लवकरच काजोल लंडनस्थित मॅडम तुसादमधील वॅक्स म्युझियममध्ये बघावयास मिळणार आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या वॅक्स म्युझियममध्ये काजोलला स्थान मिळणार असल्याने, हा तिला मिळालेला मोठा सन्मानच आहे. या प्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय-बच्चन आणि शाहरूख खान यांसारख्या मोठ्या व्यक्तींचे मेनाचे पुतळे आहेत. आता या यादीत काजोलच्याही नावाचा समावेश झाला आहे. पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित असलेली काजोल आता मॅडम तुसादची शान वाढविताना दिसणार आहे. 

रिपोर्टनुसार, याबाबतची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. मात्र याबाबतची घोषणा याचवर्षी तिच्या एका फोटोसोबत केली जाण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, जेव्हा याबाबतची घोषणा केली जाईल तेव्हा ती पती अजय देवगणसह संपूर्ण परिवारासह उपस्थित राहणार आहे. दरम्यान, म्युझियमच्या टीमचे काही सदस्य अगोदरच काजोलच्या लूकचे माप घेऊन गेले आहेत. 

काजोलने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. तिला आतापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. त्याचबरोबर ती बºयाचशा महिला आणि मुलांसंबंधीच्या सामाजिक कार्यात भाग घेत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या ‘स्वच्छ आदत स्वच्छ भारत’ या कार्यक्रमात बोलताना काजोलने म्हटले होते की, लोकांनी स्वच्छतेकरिता योगदान द्यायला हवे. यावेळी काजोलचा पती अजय देवगणनेही पत्नीच्या कार्याचे कौतुक केले होते. 

Web Title: Now, Kajol is going to enhance the beauty of Madame Tussaud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.