आता सिनेमाआधी राष्ट्रगीत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 02:31 PM2016-11-30T14:31:24+5:302016-11-30T14:31:24+5:30

केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रध्वजासह राष्ट्रगीत लावणे, बंधनकारक असेल. सर्वोच्च न्यायालयाने आज ...

Now before the movie, the national anthem !! | आता सिनेमाआधी राष्ट्रगीत!!

आता सिनेमाआधी राष्ट्रगीत!!

googlenewsNext
वळ महाराष्ट्रातच नाही तर आता देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रध्वजासह राष्ट्रगीत लावणे, बंधनकारक असेल. सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी तसे आदेश दिले. देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीच्या आदेशांची प्रत सर्व राज्यांना पाठविली जाणार आहे.

कुठल्याही व्यवसायिक कारणासाठी राष्ट्रगीतात कोणतेही फेरफार किंवा ते संक्षिप्त केले जाऊ नये. विशेषत: जाहिरातींमध्ये राष्ट्रगीताच्या अन्य स्वरूपाचा वापर करू नये.याशिवाय, आक्षेपार्ह वस्तुंवर राष्ट्रगीत छापले किंवा दाखवले जाऊ नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  
चित्रपटाआधी राष्ट्रगीत पडद्यावरून सादर केले जात असताना उभे राहावे की नाही, याची निश्चित नियमावली नाही.मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे. आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातच चित्रपट सुरू होण्यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक होते. मात्र, आता संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.  राष्ट्रगीत, तेदेखील चित्रपटाच्या पडद्यावर, सुरू असताना उभे राहायला हवे असा कोणताही कायदा वा नियम नाही.  राष्ट्रगीत म्हणू पाहणाºयास रोखण्याचा प्रयत्न झाला तर मात्र तो राष्ट्रचिन्हाचा, राष्ट्रगीताचा अपमान ठरतो आणि तो करणाºयास तुरुंगवास घडू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या समारंभात राष्ट्रगीत प्रत्यक्ष गायले जात असेल आणि उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली नाही तर देखील तो राष्ट्रगीताचा अपमान ठरतो. परंतु हा नियम चित्रपटाच्या पडद्यावर अप्रत्यक्षपणे वाजविल्या जाणाº्या राष्ट्रगीतप्रसंगी लागू होत नाही. त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहवे किंवा न राहवे याबाबत संभ्रमाचे वातावरण होते.

Web Title: Now before the movie, the national anthem !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.