आता ‘या’ संघटनेने भन्साळीचे शिरच्छेद करणाºयाला ५१ लाखाचे बक्षीस देणार असल्याची केली वल्गना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 08:25 AM2018-01-26T08:25:51+5:302018-01-26T13:55:51+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला रिलीजनंतरही विरोध होत आहे. आतापर्यंत करणी सेनेकडून विरोध होताना दिसत होते, परंतु आता ...

Now, this organization has given a 51 million prize to Bhartali's beheading! | आता ‘या’ संघटनेने भन्साळीचे शिरच्छेद करणाºयाला ५१ लाखाचे बक्षीस देणार असल्याची केली वल्गना!

आता ‘या’ संघटनेने भन्साळीचे शिरच्छेद करणाºयाला ५१ लाखाचे बक्षीस देणार असल्याची केली वल्गना!

googlenewsNext
ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला रिलीजनंतरही विरोध होत आहे. आतापर्यंत करणी सेनेकडून विरोध होताना दिसत होते, परंतु आता आणखी एका संघटनेने विरोध दर्शविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या संघटनेकडून भन्साळी यांचा शिरच्छेद करणाºयाला चक्क ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असल्याने हे प्रकरण आणखीनच तापले जाण्याची शक्यता आहे. वास्तविक या संघटनेचा हा सर्व पब्लिसिटी स्टंट असल्याचे बोलले जात आहे. 

ब्रजमंडल क्षत्रिय राजपूत महासभेच्या पदाधिकाºयांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २५ जानेवारीला भन्साळी यांचा शिरच्छेद करण्याची वल्गना केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश सिंह सिकरवार यांनी ही घोषणा करताना म्हटले की, भन्साळी यांचे शिर कलम करणाºया बक्षीस देण्यात येईल. होय, ५१ लाख रूपयांची रक्क चांदीच्या ताटात सजवून दिली जाईल. मुकेश सिंह यांच्या या घोषणेनंतर वातावरण चांगलेच तापले असून, भन्साळी यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते. 



दरम्यान, भन्साळी यांनी इतिहासात छेडछाड करून राजपूत समाजाचा अपमान केल्याचा त्यांंच्यावर आरोप केला जात आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटात सर्व काही चुकीचे दाखविल्याने समाजाच्या भावना दुखाविल्या असून, त्याचा परिणाम भन्साळीला भोगावा लागेल अशा धमक्या सातत्याने समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा ही संघटना आक्रमक झाल्याने हे प्रकरण आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे. 

Web Title: Now, this organization has given a 51 million prize to Bhartali's beheading!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.