उफ...कितनी गरीबी ! नुसरत भरूचाचा ‘हाय स्लिट’ ड्रेस पाहून नेटक-यांनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:45 PM2020-02-04T12:45:18+5:302020-02-04T12:49:05+5:30

प्रियंका चोप्राचा बोल्ड ड्रेस पाहिला, आता नुसरतचा पाहा...

nushrat bharucha shows her bold and hot look got trolled | उफ...कितनी गरीबी ! नुसरत भरूचाचा ‘हाय स्लिट’ ड्रेस पाहून नेटक-यांनी घेतली मजा

उफ...कितनी गरीबी ! नुसरत भरूचाचा ‘हाय स्लिट’ ड्रेस पाहून नेटक-यांनी घेतली मजा

googlenewsNext
ठळक मुद्देनुसरत लवकरच राजकुमार रावसोबत ‘छलांग’ या सिनेमात दिसणार आहे. 

प्यार का पंचनामा, सोनू के टीटू की स्वीटी यासारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री नुसरत भरूचा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, नुसरतने स्वत:चे काही बोल्ड फोटो शेअर केलेत आणि ती ट्रोल झाली.
या फोटोंमध्ये नुसरत हाय स्लिटच्या सुंदर ग्रीन गाऊनमध्ये दिसतेय. खरे तर या गाऊनमध्ये नुसरत कमालीची सुंदर दिसतेय. पण तिची स्टाईल नेहमीप्रमाणे काहींना रूचली नाही. रविवारी मुंबईत फिल्मफेअर अवाडर््स 2020 च्या कर्टन रेजर सेरेमनीत नुसरत हा ड्रेस घालून मिरवताना दिसली.

युसूफ अकबरने डिझाईन केलेल्या या ड्रेसमध्ये नुसरतला पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पण या वन शोल्डर लॉन्ग गाऊनचा एक साईड स्लिट जरा जास्तच लांब होता. या स्लिटमधून नुसरतचा टॅटूही स्पष्ट दिसत होता. अनेकांना तिचा हा अंदाज भावला. पण काही नेटकºयांनी मात्र यावरून नुसरतची खिल्ली उडवणे सुरु केले.


‘लेवल आॅफ फॅशन डिझाईनर, कहां कहां से कैची चलाते है ये आज कल के डिझाईनर साहब,’असे एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना लिहिले. अन्य एका युजरने तर, ‘उफ़... इस देश में कितनी गरीबी आ गई है...,’असे लिहित नुसरतला ट्रोल केले.


अगदी अलीकडे प्रियंका चोप्राही अशाच एका ड्रेसमुळे ट्रोल झाली होती. ग्रॅमी अवार्ड्समध्ये प्रियंकाने घातलेला नेकलाईन डिप गाऊन पाहून लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते. आता प्रियंकाप्रमाणेच नुसरत ट्रोल होतेय.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुसरत लवकरच राजकुमार रावसोबत ‘छलांग’ या सिनेमात दिसणार आहे. 

Web Title: nushrat bharucha shows her bold and hot look got trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.