'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुच्याचा व्देष, पण का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:56 AM2021-04-24T11:56:17+5:302021-04-24T12:00:31+5:30
Nushrratt bharuccha was upset by the criticism : नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने.
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha)आज हे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. पण यासाठी नुसरतला अपार संघर्ष करावा लागला. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर ती इथपर्यंत पोहोचली. 2011 साली आलेल्या प्यार का पंचनामा सिनेमामुळे नुसरत भरूचा हे नाव घराघरात पोहोचले मात्र याच सिनेमामुळे तिला ट्रोलदेखील केले होते. ज्यामुळे ती नाराज झाली होती. कारण नुसरतने यात साकारलेल्या भूमिकेशी तिची तुलना करु लागले आणि तिचा व्देष करु लागले.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार नुसरत एका मुलाखती दरम्यान हा खुलासा केला. ती म्हणाली, त्याच्या इमेजवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे ती जास्त दु:खी झाली. पुढे ती म्हणाली , 'प्यार का पंचनामा' मध्ये मी केलेली भूमिका आणि तिचा सिक्वेल पाहून लोकांनी माझा द्वेष करायला सुरुवात केली. कारण लोकांनी असे वाटचते होते की सिनेमात साकारलेल्या भूमिकेप्रमाणे मी खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे.
नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली. 2002 मध्ये आलेल्या या मालिकेत बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लो मुख्य भूमिकेत होती. या मालिकेतून नुसरतने छोट्या पडद्यावर एन्ट्री तर घेतली. पण वर्षभरातच ही मालिका सोडण्याचा निर्णय तिने घेतला. कारण मोठा पडदा तिला खुणावत होता. हातची मालिका सोडून नुसरत चित्रपट मिळवण्यासाठी धडपडू लागली. अनेक मेकर्सची उंबरठे झिजवल्यानंतर 2006 मध्ये अखेर तिचे नशीब फळफळले.
‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला. पहिलाच सिनेमा फ्लॉप झाल्याने नुसरतवर पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली.‘लव्ह सेक्स धोखा’ आणि ‘प्यार का पंचनामा’ हे दोन सिनेमे नुसरतच्या करिअरला कलाटणी देणारे ठरले.