नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:35 PM2021-11-16T18:35:54+5:302021-11-16T18:36:10+5:30

नुसरतने छोरी सिनेमाच्या शूटिंगच्या २५ दिवस आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास केली होती सुरुवात

Nusrat Bharucha made such preparations for the role in the film 'Chhori' | नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी

नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी

googlenewsNext

अभिनेत्री नुसरत भरुचा 'छोरी' चित्रपटातून प्रेक्षकांना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून ती एका पूर्णपणे नवीन अवतारात गर्भवती महिलेची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या व्यक्तिरेखेच्या सरावासाठी शूटिंगच्या खूप आधीपासून नुसरतने प्रेग्नंट बॉडी सूट घालायला सुरुवात केली.

'छोरी' या हॉरर चित्रपटात गर्भवती स्त्रीच्या भूमिकेत दिसणार्‍या नुसरतने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी २५ दिवस आधी प्रेग्नन्ट बॉडी सूट घालण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने गर्भवती महिलेच्या पात्रात उतरण्याचा आणि सेटवर आपले सर्वोत्तम देण्यासाठी हा निर्णय घेतला.


याबद्दल नुसरत म्हणाली, "मी खऱ्या आयुष्यात इतक्या लवकर गरोदर होणार नाही म्हणून मी एक बॉडीसूट बनवला, जेणेकरून प्रसूती असणाऱ्या स्त्रिया कोणत्या परिस्थितीतून जातात हे मला कळेल. मी २०-२५ दिवस आधीपासून तो परिधान करायला सुरुवात केली होती. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि खाणे, झोपणे, बाथरूममध्ये जाणे, फिरणे आणि त्यात येणारी बंधने समजून घेणे ही सर्व मी प्रामाणिकपणे केले. गरोदरपणाशी संबंधित सर्व गोष्टी स्वतः समजून घेण्यासाठी आणि नंतर त्यांना अधिक वास्तववादी पैलूंसह अभिनयात उतरवण्यासाठी, ज्याच्याशी प्रेक्षकांना जोडता येईल, यासाठी मला स्वतःला पूर्णपणे यात गुंतवून घ्यावे लागले. हा माझ्यासाठी प्रॉप नसला तरी माझा एक भाग होता, पण मला याची इतकी सवय झाली होती की जेव्हा शूट सुरू होते, तेव्हा मला रिहर्सल दरम्यान आराम करताना बॉडी सूटमध्ये अधिक आरामदायक वाटत होते."

बॉडी सूटशी जुळवून घेणं थोडं कठीण असतं
गर्भधारणेच्या आधुनिक पैलूबद्दल आपले विचार शेअर करताना नुसरत म्हणाली, "आम्ही एक अतिशय वास्तववादी सिनेमा करत असल्याने, सर्व काही प्रेक्षकांना स्पून फीड करण्याची गरज नाही. हे खूप सखोल असणे आवश्यक आहे. प्रेक्षकांना टिपिकल पद्धतीने न सांगता की तुम्ही खरोखर गर्भवती आहात, त्यांना यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार करणे महत्त्वाचे होते. झोपताना किंवा बाथरूमला जाताना किंवा मिड-स्क्वाट्स करताना बॉडी सूटशी जुळवून घेणं थोडं कठीण असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्त्रीची गर्भधारणा वेगळी असते आणि कधी कधी बॉडी सूट आपल्यासोबत सतत कॅरी करणे कठीण असतं."

छोरी २६ नोव्हेंबरला येणार भेटीला
नुसरतला साक्षीच्या भूमिकेत पाहण्यासाठी आणि शहरातून एका निर्जन खेडेपर्यंतचा तिचा प्रवास अनुभवण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत जिथे तिला पारलौकिक गोष्टींचा अनुभव येतो. नुसरतच्या या पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवताराद्वारे तिचे अष्टपैलू दाखवले आहे जे प्रेक्षकांना निश्चितच त्यांच्या खुर्च्यांवर खिळवून ठेवेल.विशाल फुरिया दिग्दर्शित आणि टी-सीरीज़, क्रिप्ट टीवी आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, छोरी २६ नोव्हेंबर २०२१ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Nusrat Bharucha made such preparations for the role in the film 'Chhori'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.