ना आधी ऐकलं, ना आता ऐकणार..., नुसरत जहाँची रोखठोक पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 03:56 PM2021-06-15T15:56:48+5:302021-06-15T16:01:14+5:30
अभिनय क्षेत्रातील यशस्वी करिअर, निवडणूक आणि निखील जैन याच्याशी दुसऱ्या धर्मात केलेला विवाहामुळे नुसरत जहाँ कायम चर्चेत राहिली. पण आता नुसरत जहाँ भलत्याच कारणामुळं चर्चेत आहे.
बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan ) सध्या जाम चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे, निखील जैनसोबतचे तिचे लग्न मोडल्याची चर्चा गरम आहे. दुसरे म्हणजे, नुसरत प्रेग्नंट आहे आणि तिसरे कारण काय तर प्रेग्नंट नुसरतच्या अफेअरच्या चर्चाही जोरात आहेत. पण नुसरतला जगाची पर्वा नव्हती आणि आत्ताही नाही. होय, हे आम्ही नाही तर तिची पोस्ट सांगतेय. (Nusrat Jahan Post )
अलीकडे नुसरतने माझे व पती निखील जैनचा काहीही वैवाहिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. इतकेच नाही तर आमचे लग्न अवैध असल्याचे म्हटले होते. यावरून नुसरतबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. आता या जज करणा-या लोकांना तिने आता सणसणीत उत्तर दिले आहे.
नुसरतने इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. पहिल्या पोस्टमध्ये तिने जज करणा-या लोकांना फटकारले आहे. आपणा सर्वांना एका अशा व्यक्तिची गरज असते,जी जज न करता संयमाने तुमचे म्हणणे ऐकेल, असे तिने पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. दुस-या पोस्टमध्ये तिने खंबीर महिलांबद्दल लिहिले आहे. ती लिहिते, खंबीर महिला सर्वांना आवडतात. पण ती खंबीर बनते तेव्हा तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. अर्थात खंबीर महिलेचे हेच वैशिष्ट्य आहे की, ती ना आधी कुणाचे ऐकायची, ना आता ऐकणार...
यश दासगुप्तासोबत नुसरत जहाँ रिलेशनशिपमध्ये?
मागील काही दिवसांपासून नुसरत जहाँ बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं आहे. त्याचसोबत न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दोघंही राजस्थानला गेले होते. मात्र या चर्चांवर नुसरत, निखिल आणि यश दासगुप्ता यांच्याकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आले नाही.
लग्नानंतर नुसरत जहाँ चर्चेत
नुसरत जहाँने तिचा बॉयफ्रेंड उद्योगपती निखील जैनसोबत १९ जून २०१९ रोजी लग्न केले होते. नुसरत आणि निखील यांचे लग्न हिंदू, इस्लाम प्रथा परंपरेनुसार झालं होतं. लग्नानंतर नुसरत जहाँने कपाळात सिंदूर लावून दुर्गा पुजेतही सहभागी झाली होती. तेव्हा अनेक कट्टरतावादी मुस्लिमांनी नुसरत जहाँवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला नुसरत जहाँनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.