Nyasa Devgan : काजोलच्या लेकीचं हरपलं भान; हातात ग्लास आणि...दुबईतील video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 03:49 PM2022-12-31T15:49:33+5:302022-12-31T15:51:58+5:30

सध्या न्यासा दुबईमध्ये असून तिथेच ती नववर्षाचे स्वागत करणार आहे. तिचे मित्रपरिवारासोबतचे फोटो आधीच व्हायरल झाले आहेत. आता या व्हिडिओमुळे ती ट्रोल होत आहे

nyasa-devgan-daughter-of-ajay-devgan-celebrating-new-year-with-friends-in-dubai | Nyasa Devgan : काजोलच्या लेकीचं हरपलं भान; हातात ग्लास आणि...दुबईतील video व्हायरल

Nyasa Devgan : काजोलच्या लेकीचं हरपलं भान; हातात ग्लास आणि...दुबईतील video व्हायरल

googlenewsNext

Nyasa Devgan : अभिनेत्री काजोलची (Kajol) मुलगी न्यासा देवगण सध्या भलतीच चर्चत असते. ज्याप्रकारे तिच्या लुक मध्ये बदल झालाय जो काही कायापालट झालाय यामुळे नेटीझन्सला (Netiezens) तर धक्काच बसलाय. ही आधी कशी दिसायची आणि आता बघा का झाले आहे अशा कमेंट्स सध्या तिच्या फोटोंवर येत आहेत. यामुळे ती अनेकदा ट्रोलही होत आहे.

न्यासा सध्या बॉलिवुडच्या अनेक पार्ट्यांमध्ये दिसते. सध्या स्टारकिड्स अनन्या पांडे (Ananya Pande), जान्हवी कपूर (Janhavi Kapoor), त्यांचा कॉमन फ्रेंड ओरी (Orry), नव्या नवेली (Navya Naveli), सुहाना खान (Suhana Khan) यांच्यासोबत न्यासाही आता अलीकडे दिसायला लागली आहे. मात्र तिचा बदललेला लुक, कॅमेऱ्यासमोर नर्व्हस होणं, नशेत धड चालताही न येणं हे सगळं नेटीझन्सने नोटीस केलं आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली. 

सध्या न्यासा दुबईमध्ये असून तिथेच ती नववर्षाचे स्वागत करणार आहे. तिचे मित्रपरिवारासोबतचे फोटो आधीच व्हायरल झाले आहेत. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तिच्या हातात ग्लास आहे आणि ती एका मैत्रिणीसोबत बेधडक नाचताना दिसत आहे.  तिने क्रॉप टॉप आणि मिनी  स्कर्ट घातला असून त्यात ती हॉट दिसत आहे.



न्यासाबाबत बोलायाचे झाले  काजोल व अजयची लेक न्यासा स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र सध्या न्यासा शिकतेय. आत्ता ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीत येईल, असं मला वाटत नाही, असं काजोल अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती.

Web Title: nyasa-devgan-daughter-of-ajay-devgan-celebrating-new-year-with-friends-in-dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.