आलिया भट व कतरिना कैफ आधी मालामाल होत्याच, ‘Nykaa’मुळे आणखी मालामाल झाल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:13 PM2021-11-12T14:13:48+5:302021-11-12T14:14:35+5:30

होय, Katrina Kaifला 2.02 कोटीच्या बदल्यात 22 कोटी मिळाले, Alia Bhattचे तर विचारू नका...!!

Nykaa IPO: Alia Bhatt, Katrina Kaif earn 10X returns from investments | आलिया भट व कतरिना कैफ आधी मालामाल होत्याच, ‘Nykaa’मुळे आणखी मालामाल झाल्या!

आलिया भट व कतरिना कैफ आधी मालामाल होत्याच, ‘Nykaa’मुळे आणखी मालामाल झाल्या!

googlenewsNext

ब्युटी आणि फॅशन रिटेलर ‘नायका’चा  (Nykaa) शेअर  बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आणि गुंतवणूकदार जबरदस्त मलामाल झाले आहे. नायकाचा आयपीओ बाजारपेठेत आला आणि गुंतवणूकदारांनी याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. नायकाच्या समभागाने 2018 रूपयांची पातळी गाठली. बॉलिवूडच्या दोन तारका कतरिना कैफ (Katrina Kaif) व आलिया भट  (Alia Bhatt ) यामुळे मालामाल झाल्या. होय, कतरिना व आलियाने नायकामध्ये गुंतवणूकीतून 10 पट  फायदा कमावला.

कतरिना कैफने 2018 मध्ये  नायकात 2.02 कोटींची गुंतवणूक केली होती. नायकाच्या सहकायार्न तिने तिचा ‘Kay Beauty’ हा मेकअप ब्रँड लॉन्च केला होता. वर्षभरातच याचा मोठा फायदा तिला मिळाला. होय, 2.02 कोटी गुंतवणुकीच्या बदल्यात तिला तब्बल 22 कोटी मिळालेत. 
आलियाने 2020 मध्ये नायकामध्ये 4.95 कोटींची गुंतवणूक केली होती. या बदल्यात तिला मिळाले किती तर 54 कोटी. एकंदर काय नायकच्या आयपीओला प्रचंड यश मिळाल्याने कतरिना व आलिया दोघींचीही चांदी झाली.

फाल्गुनी नायर हा नायकाच्या संस्थापक आहेत. नायकामध्ये फाल्गुनी यांचा निम्मा हिस्सा आहे. नायकाचा शेअर बाजारात लिस्ट होताच फाल्गुनी यांची संपत्ती 6.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे फाल्गुनी देशातील सर्वात श्रीमंत (सेल्फ मेड) महिला ठरल्या आहेत.
  
इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा अनुभव असलेल्या फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये नायकाची सुरुवात केली. 31 ऑगस्ट 2021पर्यंत नायकाचं अ‍ॅप 5.58 कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. आर्थिक वर्ष 2021 मध्ये नायकाला 61.9कोटी रुपयांचा नफा झाला.
  नायकानं आपलं पहिलं दुकान 2014 मध्ये सुरू केलं. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत हीच संख्या 80वर पोहोचली. सध्या देशातील 40 शहरांमध्ये नायकाची दुकानं आहेत.  आज नायकाचा समावेश देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाईट्समध्ये होतो.

Web Title: Nykaa IPO: Alia Bhatt, Katrina Kaif earn 10X returns from investments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.