‘हे’ स्टार्स बनले लेखक !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2017 12:33 PM2017-05-13T12:33:52+5:302017-05-13T18:03:52+5:30
अबोली कुलकर्णी कलाकारांना मानवी भावभावना, त्यांचे विश्व हे लवकर आत्मसात करता येते. दैनंदिन जीवनातील आपल्या इच्छा, समस्या, तक्रारी ते ...
कलाकारांना मानवी भावभावना, त्यांचे विश्व हे लवकर आत्मसात करता येते. दैनंदिन जीवनातील आपल्या इच्छा, समस्या, तक्रारी ते रूपेरी पडद्यावर प्रभावीपणे मांडतात. आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांना ‘ते’ चेहरा मिळवून देतात. हेच कलाकार जेव्हा त्यांचे अनुभव अन् अभिनय हातात लेखणी धरून शब्दबद्ध करतात. तेव्हा मात्र, भल्याभल्यांची भंबेरी उडते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत जे त्यांच्या लिखाणामुळेही वादग्रस्त ठरले. अशा कलाकरांची यादी बरीच मोठी आहे पण त्यातील काही सेलिब्रिटींच्या लिखाणाचा आढावा घेऊया...
टिवंकल खन्ना
अभिनेत्री टिंवकल खन्ना ही उत्तम अभिनेत्री तर आहेच पण एक जाणकार लेखिकाही. तिने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला. तिने ‘मिसेस फनीबोन्स’ नावाचे एक पुस्तक लिहून तिच्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर तिचे दुसरे पुस्तक ‘दि लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ यावर तिने लिहीले. यातून तिने त्यांचे चरित्र लिहिले. तिच्या दोन्ही पुस्तकांना प्रचंड मागणी आली. मध्यंतरी ती तिच्या वादग्रस्त लिखाणामुळे चर्चेत होती.
ऋषी कपूर
वादग्रस्त लिखाण करणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे ऋषी कपूर. त्यांनी १५ जानेवारी २०१७ ला त्यांचे जीवनचरित्र ‘खुल्लम खुल्ला’ वाचकांसाठी लाँच केले. ते ज्याप्रमाणे जीवन जगले ते सर्व त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रात लिहिलेय. लाँचिंग कार्यक्रमावेळी ते म्हणाले,‘मी जे जीवन जगलो ते ‘सेन्सॉर’ न करता तुमच्यासमोर ठेवले आहे.’ ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ या गाण्यावरून त्यांनी त्यांच्या चरित्राचे नाव ठेवले आहे.
अनुपम खेर
बॉलिवूडमधील कारकिर्द पाहता अनुपम खेर यांचा अभिनय प्रवास खुप प्रदीर्घ आहे. त्यांनी त्यांचा हाच प्रवास ‘द बेस्ट थिंग अबाऊट यू इज यू’ या पुस्तकातून मांडला आहे. तर ‘लेसन्स लाईफ हॅज टॉट मी’ या दुसºया पुस्तकावर सध्या ते काम करत आहेत. त्यांचे आईवडील आणि त्यांचा व्यवसाय यांच्याकडून ते ज्या गोष्टी शिकले ते या दुसऱ्या पुस्तकात मांडणार आहेत. बरेच वादग्रस्त आणि गंभीर प्रकारचे लेखन त्यांनी आत्तापर्यंत केले आहे.
इमरान हाश्मी
बॉलिवूडचा ‘सीरियल किसर’ म्हणून इमरान हाश्मी याच्याकडे पाहिले जाते. मात्र, तो एक खुप चांगला वडील असण्याबरोबरच तो कुटुंब व्यक्ती आहे. त्याचा मुलगा अयान याला कॅन्सर झाल्यावर तो खचून गेला. मात्र, त्याने हिंमत न हारता मुलाला कॅन्सरच्या विळख्यातून खेचून बाहेर काढले. त्यानंतर त्याने याच अनुभवावरून ‘द किस आॅफ लाईफ ’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याचा वैयक्तिक प्रवास, इमोशनल जर्नी आणि कॅन्सरविरूद्धची लढाई यावर त्याने अनुभव लिहिले.
शिल्पा शेट्टी
बॉलिवूडमधील एक हेल्थ कॉन्शियस अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. ती तिच्या आरोग्याविषयी विशेष जागरूक असते. तिने ‘द ग्रेट इंडियन डाएट’ या विषयावर पुस्तक लिहिले आहे. ती तिने लिहिलेल्या या पुस्तकाविषयी विशेष उत्सुक होती. तिने लिहिलेल्या पुस्तकाला कसा प्रतिसाद मिळतो? हे जाणून घेण्यासाठी तिने फॅन्ससोबत सातत्याने संवाद ठेवला. ‘यम्मी मम्मी’च्या इमेजमधून बाहेर पडून तिने एक उत्तम पुस्तक वाचकांसमोर ठेवले आहे, असे वाटते.
आयुषमान खुराणा
अभिनेता, गायक, आरजे आयुषमान खुराणा हा त्याच्या अभिनेता असण्याच्या भूमिकेतून बाहेर पडून आता लेखकही बनला आहे. त्याने २०१५ मध्ये ‘क्रॅकिंग द कोड’ हे एक वेगळ्या विषयावरील पुस्तक लिहिले आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर त्याचे अनुभव, स्ट्रगल हे त्याने या पुस्तकात लिहीले आहे. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असू शकतो. त्याप्रमाणे त्याने काहीसे वादग्रस्त लिखाण यात केले आहे.