ओए हँडसम, चंकी पांडेचा भाचा दिसतो लय भारी, फोटो पाहून फॅन्सही झाले क्रेझी

By ओमकार संकपाळ | Published: July 21, 2022 11:42 AM2022-07-21T11:42:14+5:302022-07-21T11:43:25+5:30

चंकी पांडेची मुलगी जितकी देखणी आहे. तितकाच देखणा चंकीचा भाचाही खूप देखणा आहे.चंकी पांडेचा भाच्याचे नाव आहे अहान पांडे.

OA Handsome, chunky pandey Nephew Ahaan Pandey latest photo | ओए हँडसम, चंकी पांडेचा भाचा दिसतो लय भारी, फोटो पाहून फॅन्सही झाले क्रेझी

ओए हँडसम, चंकी पांडेचा भाचा दिसतो लय भारी, फोटो पाहून फॅन्सही झाले क्रेझी

googlenewsNext

बॉलिवूडचा अभिनेता चंकी पांडेने आपल्या कॉमेडी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमात बनत त्याने रसिकांना खळखळून हसवलं, चंकी 1993 मध्ये 'आंखे' चित्रपटात दिसला होता. यानंतर त्याचा एक मोठा चित्रपट 'तेजाब', 'हाउसफुल', 'हाउसफुल 2', 'हाउसफुल 3', 'हाउसफुल 4', 'कसम', 'अपराधी', 'आग ही आग' यासारख्या अनेक चित्रपटातल्या त्याच्या भूमिका खूप गाजल्या.

चंकीच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पाऊल मुलगी अनन्या पांडेनेही अल्पावधीतच रसिकांची चांगलीच पसंती मिळवली. चंकीनंतर आनन्या आता अभिनय क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे, चंकी पांडेची मुलगी जितकी देखणी आहे. तितकाच देखणा चंकीचा भाचाही खूप देखणा आहे.चंकी पांडेचा भाच्याचे नाव आहे अहान पांडे.

आहान सध्या सोशल मीडियावर सक्रीय आहे. नुकतेच व्हायरल होत असलेले फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. कधी अहान रात्रीचे फोटोशूट करताना दिसतो तर कधी बहिणींसोबत फॅमिली फोटो क्लिक करताना दिसतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आहानचे फोटो पाहून युजर्स त्याच्यावर फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनय क्षेत्रात नसला तरी त्याचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. 

आहान पांडे हा चंकी पांडेचा धाकटा भाऊ चिक्की पांडे म्हणजेच शरद पांडेचा मुलगा आहे. चिक्कीची गणना मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींमध्येही केली जाते. अनन्यानंतर आता अहान पांडेही बॉलिवूडमध्ये एंट्री करु शकतो. अनन्या आणि अहान जवळपास एकाच वयाचे आहेत.मध्यंतरी  चंकी पांडे याची पुतणी अलाना पांडेचीही बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्या चर्चा होत्या.अलाना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिथे आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत अलाना चर्चेत असते.तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव सुरू असतो.  याशिवाय स्वतःचे व्हिडिओ शेअर करून अलाना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. आगामी काळात अनन्याप्रमाणेच आहान आणि अलाना बॉलिवूडमध्ये नशीब आजमवणार का हे तर वेळच ठरवेल.

Web Title: OA Handsome, chunky pandey Nephew Ahaan Pandey latest photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.