सैन्य दिवसाच्या निमित्ताने अक्षय कुमारने घेतली जैसलमेरमधील जवानांची भेट, त्यांच्यासोबत खेळला व्हॉलीबॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:52 AM2021-01-15T11:52:20+5:302021-01-15T11:52:59+5:30
सैन्य दिवसाच्या निमित्ताने अक्षय कुमारने जैसलमेरमधील जवानांची भेट घेतली आहे.
आज सैन्य दिवस असून या निमित्ताने बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सनॉनने पश्चिम राजस्थानमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॉर्डर येथील जैसलमेरमधील जवानांची भेट घेतली. अक्षय कुमारने त्यांच्याशी बातचीत केली. या दिवसाचे औचित्य साधून अभिनेत्याने विजय रण फॉर सोल्जर मॅरेथॉनला हिरवा कंदिल दाखवला. जवानांनीदेखील अक्षय कुमार आणि क्रिती सनॉनचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
सैन्य दिवसाच्या निमित्ताने सकाळी जैसलमेरमधील आर्मी स्टेशनच्या सगत सिंग स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजय रण फॉर सोल्जर मॅरेथॉनला अक्षय कुमार आणि क्रिती सनॉनने हिरवा कंदिल दिला. तसेच अक्षय कुमारने जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी त्या ठिकाणी सैन्यांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने जवान उपस्थित होते. सैन्यातील जवान सिनेइंडस्ट्रीतील स्टार्सना पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसले.
अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सनॉन सध्या गोल्डन सिटी जैसलमेरमध्ये बच्चन पांडे चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. मागील १० दिवसापासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या दोघांसोबत अभिनेता अर्शद वारसीदेखील तिथे आहे.
तसेच जैसलमेरमध्ये सध्या भूत चित्रपटाचेदेखील शूटिंग चालू आहे. त्यासाठी सैफ अली खान आणि इतर कलाकार उपस्थित आहेत. दोन्ही चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे.