Shocking : लाईव्ह कार्यक्रमात दिग्गज गायकाने घेतला जगाचा निरोप, झाली KK ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:49 AM2022-10-04T11:49:56+5:302022-10-04T11:59:42+5:30

केकेनंतर आणखी एका दिग्गज गायकाने जगाचा निरोप घेतला आहे. ते खुर्चीवरून अचानक खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Odisha singer Murali Mohapatra collapses on stage durga puja event declared dead at hospital | Shocking : लाईव्ह कार्यक्रमात दिग्गज गायकाने घेतला जगाचा निरोप, झाली KK ची आठवण

Shocking : लाईव्ह कार्यक्रमात दिग्गज गायकाने घेतला जगाचा निरोप, झाली KK ची आठवण

googlenewsNext

ओडिशाचे प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा यांचं निधन झाले आहे. मुरली हे ओडिशाचे प्रसिद्ध गायक होते. मुरली महापात्रा हे कोरापुट जिल्ह्यात दुर्गापूजेदरम्यान परफॉर्म करत होते, यादरम्यान ते अचानक स्टेजवर पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

चार गाणी गायल्यानंतर अचानक बिघडली तब्येत 
रिपोर्टनुसार  महापात्रा यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठिक नव्हती. जेयपोर शहरातील कार्यक्रमात त्यांनी चार गाणी गायली. यानंतर ते खुर्चीवरून अचानक खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुरली महापात्रा यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. महापात्रा हे ओडिशातील प्रसिद्ध गायक होते. जेयपोर त्यांना अक्षय मोहंती या नावानेही ओळखले जात होते. गायन कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ते जयपूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करायचे.

लोकांना आली केकेची आठवण
मुरली महापात्रा यांच्या आकस्मिक निधनामुळे लोकांना गायक के.के. यांची आठवण आली.  यावर्षी के के कोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. के के यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रात शोककळा पसरली होती. केकेच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. चाहत्यांनी आणि बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी गायकाला श्रद्धांजली वाहिली. गायक केके त्यांचा पल अल्बमसह बॉलिवूडमधील काही सर्वोत्कृष्ट गाणी गाण्यासाठी ओळखले जात होते.

केके व्यतिरिक्त मनोरंजन क्षेत्रातील मोठे स्टार असलेले कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ते 42 दिवस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात होते. मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. राजू श्रीवास्तव हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते.

Web Title: Odisha singer Murali Mohapatra collapses on stage durga puja event declared dead at hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.