अगं दीपिका, हे वागणं बरं नव्हं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 07:03 AM2018-06-11T07:03:24+5:302018-06-11T12:37:15+5:30
‘पद्मावत’ हा २०१८ मधील सुपरडुपर हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट. या चित्रपटावरून बराच वाद झाला. या वादाने अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री ...
‘ द्मावत’ हा २०१८ मधील सुपरडुपर हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट. या चित्रपटावरून बराच वाद झाला. या वादाने अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री ढवळून निघाली. पण सरतेशेवटी संजय लीला भन्साळींच्या या अजरामर कलाकृतीने सगळ्यांची मने जिंकलीत. या चित्रपटात राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसलेल्या दीपिका पादुकोण हिने तर सगळ्यांनाच वेड लावले. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. पण आता कदाचित ‘पद्मावत’चे हेच यश दीपिकाच्या मार्गातील खोडा बनण्याची चिन्हे आहेत. होय, ‘पद्मावत’ सुपरहिट झाल्यानंतर दीपिकाचे भाव कधी नव्हे इतके वधारल्याचे कळतेय. आता तर दीपिका म्हणे, नव्या दिग्दर्शकांना सावलीत उभे करायलाही तयार नाही.
डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पद्मावत’ सुपरहिट झाल्यानंतर दीपिकाने आपल्या फीसमध्ये भरघोस वाढ केली आहे. केवळ इतकेच नाही तर नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायलाही तिने नकार दिला आहे. केवळ मोठ्या दिग्दर्शकांनीचं आपल्याकडे यावे आणि त्यातही त्यांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकाचं तेवढी मिळावी, असे दीपिकाचे म्हणणे आहे. साहजिकच अनेक नव्या दिग्दर्शकांना दीपिकाचा हा तोरा खटकू लागला आहे. एका नव्या दिग्दर्शकाने यासंदर्भातील आपली नाराजी बोलून दाखवली. ‘ही सगळी संजय लीला भन्साळींची चूक आहे. ‘पद्मावत’च्या यशानंतर आपण नंबर वनच्या शर्यतीच्या पलीकडे गेलो आहोत, असे दीपिकाला वाटू लागले आहे. आता तिला केवळ दिग्गजातील दिग्गज दिग्दर्शकांसोबतचं काम करायचेय. सोबतचं चित्रपटाची स्क्रिप्टही तिला तिच्या मनानुसार हवी आहे,’असे या दिग्दर्शकाने सांगितले.
ALSO READ : आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली दीपिका पादुकोण; ही ‘वेडिंग शॉपिंग’ तर नाही?
इंडस्ट्रीतील काही जाणकारांचे मानाल तर असे वागून दीपिका स्वत:चेचं नुकसान करून घेतेय. मानधनात मनमानी वाढ हे तिच्या करिअरसाठी घातक आहे. सध्या दीपिका इंडस्ट्रीतील टॉप मोस्ट अभिनेत्री आहे. पण करिअरच्या या वळणावर ती इतक्या अटी लादू पाहत असेल तर या शर्यतीत ती फार काळ टिकू शकणार नाही. अर्थात काहींचे मानाल तर नायिका नायकांच्या तोडीचे मानधन मागू लागल्यात तर त्यात गैर काय? शेवटी परफॉर्मन्स ओरिएन्टेड चित्रपट देऊन अनेकींनी स्वत:ला सिद्ध केले आहे. दीपिकानेही अनेक चित्रपट स्वबळावर यशस्वी करून दाखवले आहेत. आता तुमचे याबद्दल काय मत आहे, ते आम्हाला जरूर कळवा.