अरेच्चा! मिलिंद सोमणने ८० वर्षीय वृद्ध महिलेला दिले फिटनेस चॅलेंज, जाणून घ्या या महिलेबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:43 IST2019-05-13T17:42:52+5:302019-05-13T17:43:24+5:30
मिलिंद सोमणने आपल्या ८० वर्षीय आईला फिटनेस चॅलेंज दिले आणि आपल्यासोबत १५ पुशअप्स मारण्यास सांगितले.

अरेच्चा! मिलिंद सोमणने ८० वर्षीय वृद्ध महिलेला दिले फिटनेस चॅलेंज, जाणून घ्या या महिलेबद्दल
अभिनता व मॉडेल मिलिंद सोमण फिटनेससाठी ओळखला जातो. त्याचे देशभरात खूप चाहते आहेत. वयाच्या ५३ व्या वर्षातदेखील तो अशी एक्सरसाईज करतो की जी पाहून तरूण वर्गदेखील चक्रावून गेले आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने मिलिंदने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्याने त्याच्या ८० वर्षीय आईला साडीत पुश अप्स मारण्याचे चॅलेंज दिले आहे. इतकेच नाही तर या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद सोमणने महिलांना फिट राहण्याची विनंती केली आहे.
मिलिंद सोमणने सर्व आईंना मदर्स डेच्या शुभेच्छा देत एक स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची ८० वर्षीय आई उषा पुशअप्स करताना दिसत आहेत. मिलिंद सोमण 53 वर्षाचा असून त्याची आई नेहमीच त्याला फिटनेस चॅलेंज देत असते. यामुळेच त्याने मदर्स डेच्या निमित्ताने आईला चॅलेंज दिले आहे.
It's never too late.
— Milind Usha Soman (@milindrunning) May 12, 2019
Usha Soman, my mother.
80 years young.#mothersday#love#mom#momgoals#fitwomen4fitfamilies#fitness#fitnessmotivation#healthylifestyle#fitterin2019#livetoinspire make every day mother's day!!!!! 😃😃😃 pic.twitter.com/7aPS0cWxlR
व्हिडिओ शेअर करून मिलिंद म्हणाला की, तुम्ही देखील स्वतःला फिट ठेवण्यासाठी दररोज दहा मिनिटांचा वेळ द्या.
त्याने इंस्टाग्रामवर सांगितले की, उषा सोमण, माझी आई, ८० वर्षांची तरूणी. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक दिवसाला मातृदिन बनवा.
मिलिंद सोमणच्या आईची समाजासमोर आदर्श निर्माण करण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. त्या ७० वर्षांच्या असताना त्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता आणि सर्वांसमोर एक आदर्श ठेवला होता.
मिलिंदला फक्त त्याच्या आईचीच नाही तर त्याची पत्नी अंकिता कुंवरचीदेखील साथ पहायला मिळते.