अरे वाह...! हृतिक रोशन स्वतः सोबत त्याच्या टीमच्या फिटनेसशी घेतो काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 06:00 AM2019-05-02T06:00:00+5:302019-05-02T06:00:00+5:30

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे.

Oh wow ...! Take care of Hrithik Roshan himself along with his team's fitness | अरे वाह...! हृतिक रोशन स्वतः सोबत त्याच्या टीमच्या फिटनेसशी घेतो काळजी

अरे वाह...! हृतिक रोशन स्वतः सोबत त्याच्या टीमच्या फिटनेसशी घेतो काळजी

googlenewsNext

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. तसेच फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी तो सक्त डाएट व वर्कआऊट करतो हे तर सगळ्यांनाच माहित आहे. पण सध्या त्याने त्याच्या टीमसोबत वर्कआऊट करायला सुरूवात केली आहे आणि आपल्यासोबत तो त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देतो. 

अभिनेता हृतिक रोशनची बारा-तेरा जणांची टीम असून ते नेहमी त्याच्यासोबत शूटला व इतर ठिकाणी असतात. त्यामुळे ते एका कुटुंबासारखेच वावरतात. त्यामुळे हृतिक ज्याप्रमाणे स्वतःच्या फिटनेसबाबत जागरूक आहे. तसाच तो त्याच्या टीमच्या फिटनेसकडे लक्ष देतो. आऊट डोअर चित्रीकरणाच्या शेड्युलवेळी त्याची टीमने व्यायामासाठी लागणारे कपडे व शूजदेखील घेतले आहेत की नाही, याकडे आवर्जुन लक्ष देतो.


हृतिक रोशन नेहमीच विविध भूमिकांतून रसिकांना भुरळ पाडली आहे.

आता लवकरच तो सुपर ३० मध्ये झळकणार आहे. या चित्रपटातो तो गणितज्ज्ञांच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यांनी तीस विद्यार्थ्यांना आईआईटी -जेईईच्या परीक्षेसाठी तयार केले होते. हा चित्रपट २६ जुलेैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


या चित्रपटाशिवाय हृतिक टायगर श्रॉफसोबत डान्सवर आधारीत चित्रपट दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. मात्र हृतिक स्वतःसोबत आपल्या टीमच्या फिटनेसची एवढी काळजी घेतो, ही खरेच कमालीची बाब आहे.

Web Title: Oh wow ...! Take care of Hrithik Roshan himself along with his team's fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.