अरेच्चा ! बॉलिवूडमध्ये दीपिका प्रियंका नाही तर ही आहे सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 11:22 AM2020-04-29T11:22:45+5:302020-04-29T11:23:29+5:30

आलियानं गेल्या वर्षी 59.21 कोटी रुपये कमावले होते. 2018 मध्ये तिची कमाई 58.83 कोटी होती. आलियाचे सिनेमाव्यतिरीक्त अनेक स्टार्टअप्स आहेत. तिनं अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत.

 Ohooo! Deepika Nor Priyanka Chopra Alia Bhatt is the highest-earning woman in Bollywood-SRJ | अरेच्चा ! बॉलिवूडमध्ये दीपिका प्रियंका नाही तर ही आहे सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

अरेच्चा ! बॉलिवूडमध्ये दीपिका प्रियंका नाही तर ही आहे सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

googlenewsNext


सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. स्टुंडटऑफ द इअर मधून आलिया भट्टने खूप नाव मिळवलं.

 अगदी कमी वयातच जिने आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. 2 स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, हायवे, डिअर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी ते काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला गलीबॉय चित्रपटात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळे आलियाची चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिक म्हणून गणना होते.

आलिया भट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी अ‍ॅक्ट्रेस आहे. आलिया सिनेमांसोबतच इतर मार्गांनीही पैसे कमावते. ती एक चांगली बिजनेसपर्सनही आहे. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या 2019 मधील टॉप 100 सेलिब्रेटींमध्ये आलिया 8 व्या क्रमांकावर आहे. अ‍ॅक्ट्रेसपैकी ती पहिल्यां स्थानावर आहे. आलियानं गेल्या वर्षी 59.21 कोटी रुपये कमावले होते. 2018 मध्ये तिची कमाई 58.83 कोटी होती. आलियाचे सिनेमाव्यतिरीक्त अनेक स्टार्टअप्स आहेत. तिनं अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत. अलीकडेच तिनं फॅशन टॅक स्टार्टअपमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत.

अनेक ब्रँडसोबत जोडली गेली आहे. ब्रँडची जाहिरात करूनही आलिया चांगली कमाई करते. इंस्टाग्राम- सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनी हॉपर्स HQ नं इंस्टाग्राम रिच लिस्ट 2019 जारी केली होती. यात सांगितलं होतं की, एक सेलिब्रिटी आपल्या एका पोस्टसाठी किती कमावतात. यात सांगितलं होतं की, आलिया प्रत्येक इंस्टा पोस्टमधून 1 कोटी कमावते असं यातून समोर आलं होतं. अशा प्रकारे सिनेमाच्या मिळालेल्या रक्कम ती एकात दुस-या ठिकाणी गुंतवणून पैसा जोडते. त्यामुळे पैसाच पैस्याला जोडतो हीच बाब आलिया भट्टबद्दल तंतोतंत लागू ठरते.

Web Title:  Ohooo! Deepika Nor Priyanka Chopra Alia Bhatt is the highest-earning woman in Bollywood-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.