Om Puri Biopic : नंदिता पुरीसह चार निर्मात्यांत ‘कोल्ड वॉर’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 03:52 PM2017-01-22T15:52:12+5:302017-01-22T21:22:12+5:30

अभिनेते ओम पुरी यांच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूची पोलीस चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. या प्रकरणांची मिमांसा होण्यापूर्वीच ओम पुरी ...

Om Puri Biopic: 'Cold War' in four makers with Nandita Puri | Om Puri Biopic : नंदिता पुरीसह चार निर्मात्यांत ‘कोल्ड वॉर’

Om Puri Biopic : नंदिता पुरीसह चार निर्मात्यांत ‘कोल्ड वॉर’

googlenewsNext
िनेते ओम पुरी यांच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूची पोलीस चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. या प्रकरणांची मिमांसा होण्यापूर्वीच ओम पुरी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांमध्ये ‘कोल्ड वार’ निर्माण झाल्याचे चित्र आहे. निर्माता प्रकाश झा व महेश भट्ट यांच्या शिवाय आणखी दोन प्रोडक्शन कंपन्यांनी दिवंगत ओम पुरी यांच्या बायोपिकची तयारी चालविली आहे. 

ओम पुरी यांचा मृतदेह ६ जानेवारी २०१७ रोजी त्यांच्या राहत्या घरी आढळून आला होता. ओम पुरी यांचा मोबाईल मिळत नसल्याने व मृत्यूची घटना संशयास्पद असल्याने या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहे. ओम पुरी यांनी बॉलिवूडमध्ये केलेला संघर्ष, हॉलिवूडपर्यंतचा प्रवास व संशयास्पद मृत्यू यावर निर्मात्यांनी स्वारस्य दाखविणे सुरू केले आहे. ओम पुरी यांच्या पत्नी व पत्रकार नंदिता पुरी हिने ओम पुरीच्या आत्मचरित्राचे लिखान केले आहे. या आत्मचरित्रावरून त्यांच्या पत्नीसोबत वाद झाला होता. तेव्हापासून दोघेही वेगळे राहत होते. Read More : या मराठी चित्रपटाने ओम पूरी यांनी केली करियरची सुरूवात

ओम पुरी यांचा जीवनपट पाहता, त्याच्या जीवनावर निर्माते चित्रपटाची तयारी करीत आहे. ओम पुरी यांच्या आत्मचरित्रावर हा चित्रपट आधारित असेल असे सांगण्यात येते. यामुळे चित्रपटाचे अधिकार मिळविण्यासाठी प्रकाश झा आणि मुकेश भट्ट यांनी नंदिता पुरी यांच्याकडे परवाणगी मिळविण्याची प्रक्रिया चालविली आहे. तर दुसरीकडे अन्य दोन निर्मात्यांनी ओम पुरी यांची पहिली पत्नी आणि अन्नू कपूरची बहिण सीमा कपूरशी संपर्क केला असल्याचे सांगण्यात येते. Read More : ओम पुरी यांचे वादग्रस्त जीवन



मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश झा यांचा चित्रपट काल्पनिक कथेवर आधारित असून त्यात ओम पुरी यांचा संघर्ष व यश शिवाय त्याची दोन लग्ने व त्यांचे वाद याचा समावेश असेल. दुसरीकडे महेश भट्ट यांनी नंदिता पुरी यांनी लिहलेल्या ओम पुरीच्या आत्मकथेचा आधार घेत चित्रपटाची निर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी दोन्ही निर्माते नंदिता पुरीच्या संपर्कात आहे. अन्य दोन निर्मात्यांपैकी एक आंतराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट तयार करण्याची तयारी करीत असून त्यात हॉलिवूड अभिनेते देखील काम करू शकतात. दरम्यान अशीही चर्चा आहे की, नंदिता पुरी देखील ओम पुरी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मितीची योजना आखत असून कथा लिहण्यास सुरुवात केली आहे. तिला एका निर्मिती कंपनीने बॅकअपचे आश्वासन दिले आहे. मात्र नंदिता पुरी यांनी यावर कोणतिही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. Read More : ​ओमपुरी यांच्या मृत्यूची पोलीस करणार चौकशी

सूत्रांनुसार, प्रकाश झा यांच्या चित्रपटात ओम पुरी यांची भूमिके साठी मनोज वाजपेयी याचे नाव आघाडीवर असून तो देखील ही भूमिका करण्यास उत्सुक आहे. ‘माझ्या शिवाय ओम पुरीची भूमिका कुणी चांगल्या पद्धतीने साकारू शकत नाही’ असे मत त्याने व्यक्त केले आहे. दुसरीकडे महेश भट्ट यांच्या चित्रपटात ही भूमिका इरफान खान याचे नाव आघाडीवर आहे. मात्र इरफानकडून त्याबद्दलचा दुजोरा मिळालेला नाही. या शिवाय ओम पुरी यांच्या भूमिकेसाठी के.के. मेनन, आदिल हुसैन, विजय राज यांची नावे चर्चेत आहे. Read More : ओम पुरी यांचे काही अविस्मरणीय चित्रपट



असेही सांगण्यात येते की, नंदिता पुरी यांना फोनवरून धमक्या मिळत असल्याची तक्रार पोलिसात केली असून तिने सुरक्षेची मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. या धमक्यांचा संबध ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा कपूरशी जोडला जात आहे. दरम्यान पोलीस ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी करीत असून कोणत्याही गोष्टीला हलक्याने घेणार नाही असे जाणकारांचे मत आहे. ओम पुरी यांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्टही अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. यामुळे पोलिसही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत नसल्याच्या बातम्या आहेत. Read More : ​ओम पुरी यांना त्यांची दुसरी पत्नी त्रास देत होती; अन्नू कपूरचा खुलासा

अशावेळी ओम पुरी यांच्या बायोपिक निर्मितीचा वाद कोर्टात पोहचू शकतो. यावर ओम पुरी यांच्या दोन पत्नी पैकी एक आपला दावा करू शकते. ही देखील निर्मात्यांसाठी रिस्क असणार आहे. 

ALSO READ 
ओम पुरींच्या डोक्याला खोल जखम, हाताला फ्रॅक्चर; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे !
ओम पुरी यांची मानसिक अवस्था ढासळली होती - नसिरुद्दीन शाह

Web Title: Om Puri Biopic: 'Cold War' in four makers with Nandita Puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.