ओम पुरींचा शेवटचा चित्रपट 'लस्थम पस्थम', दिसणार टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 03:02 PM2018-07-25T15:02:34+5:302018-07-25T15:06:18+5:30

'लस्थम पस्थम' चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तानच्या नात्यावर आधारित आहे.

Om Puri's last film 'Latham Pastham', will appear in Taxi Driver's role | ओम पुरींचा शेवटचा चित्रपट 'लस्थम पस्थम', दिसणार टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत

ओम पुरींचा शेवटचा चित्रपट 'लस्थम पस्थम', दिसणार टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे 'लस्थम पस्थम'च्या ट्रेलरमध्ये सांगण्यात आलीय दोन भावांची कथा  'लस्थम पस्थम'चे चित्रीकरण पार पडले दुबईत

अभिनेते ओम पुरी यांचा शेवटचा चित्रपट 'लस्थम पस्थम' 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.  २५ जुलैला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये ओमपुरी टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन आणि डायरेक्शन मानव भल्ला यांनी केले आहे. हा मानव यांचा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तानच्या नात्यावर आधारित आहे.

ओम पुरी यांचे 6 जानेवारी 2017 मध्ये हृद्यविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. फेब्रुवारी 2017 मध्ये आलेल्या 'द गाजी अटॅक' आणि फेब्रुवारी 2017 मध्ये रिलीज झालेला 'व्हाइसरॉय हाउस' (इंग्रजी) मध्ये नूरच्या भूमिकेत ओम पूरी दिसले होते. यासोबतच सलमान खानच्या 'ट्यूबलाइट'मध्ये ते बन्ने चाचाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट जून 2017 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर आता ते 'लस्थम पस्थम' चित्रपटात दिसणार आहेत.
 'लस्थम पस्थम'च्या  ट्रेलरमध्ये दोन भावांची कथा सांगण्यात आली आहे. एक पाकिस्तानी आहे आणि दूसरा भारतीय आहे. दुबईमध्ये शूट झालेल्या या चित्रपटात मैत्री, एकात्मता आणि भारत-पाकिस्तानच्या लोकांमधील द्वेश दाखवण्यात आला आहे. एका सीनमध्ये ओम पुरी म्हणतात की, 'एक इंसान को दूसरे इंसान की मदद करने के लिए कोई वजह चाहिए।' दूसऱ्या सीनमध्ये ओमपुरी चित्रपटाच्या अॅक्टरला म्हणतात की, 'हमारा बंटवारा जरूर हुआ है, लेकिन मिट्‌टी तो हमारी आज भी एक है। '

ओम पुरी यांच्यासोबत चित्रपटात टिस्का चोप्रा, डॉली अहलूवालिया, इशिता दत्ता, विभव रॉय, समर विरमानी, फेरीना वाजेरही आहेत. या चित्रपटाचे शीर्षक गेल्या महिन्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्वतः ओम पुरी हे ट्रेलरच्या शेवटी लस्थम-पस्थमचा अर्थ विचारताना दिसत आहेत. आता 'लस्थम पस्थम' म्हणजे काय हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. 

Web Title: Om Puri's last film 'Latham Pastham', will appear in Taxi Driver's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.