ओम पुरी यांची मानसिक अवस्था ढासळली होती - नसिरुद्दीन शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 06:04 PM2017-01-08T18:04:05+5:302017-01-09T11:19:15+5:30

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत ‘पॅरलेल सिनेमा व पॅरलेल करिअर’ करणारे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या जीवनाबद्दल ...

Om Puri's mental state was deteriorating - Naseeruddin Shah | ओम पुरी यांची मानसिक अवस्था ढासळली होती - नसिरुद्दीन शाह

ओम पुरी यांची मानसिक अवस्था ढासळली होती - नसिरुद्दीन शाह

googlenewsNext
लिवूडचे दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत ‘पॅरलेल सिनेमा व पॅरलेल करिअर’ करणारे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. आपल्या जीवनाच्या अंतिम काळी ते मानसिक रित्या खचलेले होते असे नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले. 

नसिरु द्दीन शाह यांनी ‘डीएनए’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून ओम पुरी बाबतची ही माहिती समोर आली आहे. नसिरुद्दीन शाह म्हणाले, ओम पुरीसोबत माझे नेहमीच मित्रत्वाचे नाते राहिले आहे. त्यांनी अनेक चित्रपटात विविध भूमिका केल्या. ज्या कधी काळी माझ्याकडे आल्या होत्या, जसे ‘इस्ट इज इस्ट’ पण यामुळे मला ओम पुरी विषयी कधीच इर्ष्या झाली नाही. मी नेहमीच त्याच्यासोबत आनंद साजरा केला आहे. मात्र, त्याच्या खाजगी आयुष्यात मी कधीच हस्तक्षेप केला नाही. ओम पुरी यांची मानसिक व शारीरिक अवस्था ढासळली होती. हे खरे आहे की मागील काही वर्षांपासून ते या सर्व समस्येंचा सामना करीत होते. यातून बाहेर येण्याचा मार्ग काही त्यांना दिसत नसावा. मात्र त्यांचा मृत्यू माझ्यासाठी अनपेक्षित होता. एका दृष्टीने ओम पुरी यांना या सर्व दुखातून मुक्ती मिळाली आहे. त्यांनी खराब चित्रपटात काम करण्यामागे हेच कारण होते. काही आर्थिक कारणेही असू शकतात. ओम स्वत:ची समीक्षा करीत होते. 

Om Puri

नसिरुद्दीन शाह यांनी ओम पुरी यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले. ‘मी आणि ओम पुरी यांनी जाने भी दो यारो, मिर्च मसाला या सारख्या चित्रपटात काम केले. सई परांजपे यांच्या ‘स्पर्श’ या चित्रपटात त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मी त्याला लहान भूमिका करताना तुला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला. ओम मला शिव्या द्यायला लागले आणि म्हणाले, अरे यार, मी हे तुझ्यासाठी करीत नाही, मी हे करतोय कारण, माझा चित्रपटांवर विश्वास आहे. 

दिवंगत ओम पुरी आणि नसिरुद्दीन शहा हे दोघेही नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) व पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्ट्यिुट आॅफ इंडिया येथे येथे एकत्र शिक्षण घेतले होते. सोबतच दोघांनी अनेक कलात्मक व व्यवासायिक चित्रपटात एकत्र काम केले आहे. नसिर व ओम पुरी यांची मैत्री बॉलिवूडमध्ये घनिष्ठ समजली जाते. 

Om Puri

Web Title: Om Puri's mental state was deteriorating - Naseeruddin Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.