‘OMG 2’बद्दल अक्षयने घेतला मोठा निर्णय? चाहते निराश, केली डिमांड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 03:40 PM2023-03-16T15:40:51+5:302023-03-16T15:43:11+5:30

Oh My God 2 : सलग फ्लॉप सिनेमांमुळे अक्षयची चिंता वाढली आहेच. त्याचे चाहतेही निराश आहे. अशात  अक्कीच्या OMG 2 कडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आता या चित्रपटाबद्दल एक नवी अपडेट समोर येतेय.

OMG 2 akshay kumar film oh my god will release on OTT fans upset | ‘OMG 2’बद्दल अक्षयने घेतला मोठा निर्णय? चाहते निराश, केली डिमांड

‘OMG 2’बद्दल अक्षयने घेतला मोठा निर्णय? चाहते निराश, केली डिमांड

googlenewsNext

Oh My God 2 Akshay Kumar  : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे अलीकडे आलेले अनेक सिनेमे फ्लॉप गेलेत. थिएटरमध्ये रिलीज झालेले आपटलेच, पण ओटीटीवर आलेले सिनेमेही लोकांना भावले नाहीत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला त्याचा सेल्फी हा सिनेमाही कमाल दाखवू शकला नाही. सलग फ्लॉप सिनेमांमुळे अक्षयची चिंता वाढली आहेच. त्याचे चाहतेही निराश आहे. अशात  अक्कीच्या OMG 2 कडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आता या चित्रपटाबद्दल एक नवी अपडेट समोर येतेय. होय, OMG 2 हा सिनेमा चित्रपटगृहांत नाही तर ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं कळतंय. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्यानं हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. साहजिकच यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

OMG 2 खरंच ओटीटीवर रिलीज होणार की ही निव्वळ एक अफवा आहे, हे कळायला मार्ग नाही. पण तूर्तास ट्विटरवर OMG 2 ट्रेंड होतोय. हा सिनेमा थिएटरमध्येच प्रदर्शित करा, अशी मागणी चाहते करत आहेत.  एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि निर्माते OMG 2 बद्दल डायरेक्ट टू डिजिटलच्या विचारात आहेत. हा सिनेमा वूट किंवा जियोवर प्रदर्शित मेकर्सचा विचार आहे. अर्थात अद्याप अक्षयने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण चाहते हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यास इच्छूक आहेत. 

2012 मध्ये अक्षय कुमारचा OMG  रिलीज झाला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षयसोबत परेश रावल मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट धार्मिक श्रद्धांवर आधारित होता. OMG 2 या चित्रपटामध्ये अक्षय कुमार,पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे.  

Web Title: OMG 2 akshay kumar film oh my god will release on OTT fans upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.