OMG! बॉलिवूडच्या या अभिनेत्याची ट्रेनमधून प्रवास करताना झाली गैरसोय, पहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 06:19 PM2019-11-30T18:19:01+5:302019-11-30T18:19:35+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 OMG! The Bollywood actor's inconvenience while traveling by train, watch video | OMG! बॉलिवूडच्या या अभिनेत्याची ट्रेनमधून प्रवास करताना झाली गैरसोय, पहा व्हिडिओ

OMG! बॉलिवूडच्या या अभिनेत्याची ट्रेनमधून प्रवास करताना झाली गैरसोय, पहा व्हिडिओ

googlenewsNext


बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा यांनी दमदार अभिनय व कॉमिक टायमिंगमुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तो प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी आणि रडविण्यासाठी माहिर आहे. संजय मिश्रा सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते ऑगस्ट क्रांती रेल्वेगाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्यांना नीट ओळखताही येत नाही आहे.

संजय मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते ट्रेन अटेंडन्टच्या सीटवरुन झोपलेले दिसत आहेत. संजय अटेंडन्टच्या सीटवर झोपलेले असतात आणि अचानक त्यांच्यासमोर कॅमेरा येतो. त्यानंतर आरपीएफ पोलिसांसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं, कधी पॅसेंजर, कधी अटेंडन्ट. फक्त जीवनाचा प्रवास एन्जॉय करायचा दुसरा कोणताच पर्याय नाही.  त्यांच्या या ट्वीटमध्ये त्यांनी ऑफिशिअल IRCTC अकाउंटला आणि रेल्वे मिनिस्ट्रीला सुद्धा टॅग केलं आहे.




ही ट्रेन आहे ‘ऑगस्ट क्रांती’ जी दिल्ली ते मुंबई असा प्रवास करते. या ट्रेनधून संजय यांनी एका प्रसिद्ध सेलिब्रेटी सारखं नाही तर एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रवास केला. त्यांनी ट्रेनचं रिझर्व्हेशन केलं होतं मात्र सीट कन्फर्म न झाल्यानं अटेंडरच्या सीटवरुन प्रवास करावा लागला.




याआधी सुद्धा संजय मिश्रा यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ते काही महिलांसोबत जात्यावर डाळ दळताना दिसत होते. या व्हिडीओमध्ये ते एखाद्या समान्य व्यक्तीसारखं काम करताना दिसत होते. 

Web Title:  OMG! The Bollywood actor's inconvenience while traveling by train, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.