OMG : मुंबईच्या रेड लाइट एरियात पोहोचली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 01:59 PM2017-11-01T13:59:18+5:302017-11-01T19:29:18+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचा ‘रमन राघव २.०’ फेम अभिनेत्री शोभिता धूलिपाला सध्या तिच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करीत आहे. ...

OMG: Bollywood actress 'only' reached red light area | OMG : मुंबईच्या रेड लाइट एरियात पोहोचली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री!

OMG : मुंबईच्या रेड लाइट एरियात पोहोचली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री!

googlenewsNext
िनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचा ‘रमन राघव २.०’ फेम अभिनेत्री शोभिता धूलिपाला सध्या तिच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करीत आहे. चित्रपटात असलेली भूमिका परफेक्ट व्हावी यासाठी ती कुठलीच कसर सोडू इच्छित नसल्याने ती त्याकरिता वाट्टेल प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. शोभिता आगामी ‘मूतोन’ या द्विभाषी चित्रपटात झळकणार असून, त्यासाठी ती चक्क मुंबईतील कमाठीपुरा या रेड लाइट एरियामध्ये गेली होती. या चित्रपटाला मोहनदास दिग्दर्शित करणार असून, हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज होणार आहे. 

शोभिता कमाठीपुरा या रेड लाइट एरियामध्ये राहणाºया वारंगणांचे जीवन जाणून घेण्यासाठी गेली होती. जेव्हा तिने तेथील महिलांशी संवाद साधला तेव्हा तिला धक्काच बसला. शोभिता तिच्या या आगामी चित्रपटात या महिलांशी संबंधित एक भूमिका साकारत असल्याने ती त्यांचे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शोभिताच्या मते, तिने जेव्हा या महिलांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्याकडून बºयाच काही गोष्टी समजून घेतल्या. याविषयी शोभिता म्हणतेय की, ‘मूतोन’मध्ये मी कमाठीपुरामधील एका तेजतर्रार महिलेची भूमिका साकारणार आहे. कमाठीपुरा जगातील सर्वात मोठ्या रेड लाइट एरियापैकी एक आहे. आम्ही याठिकाणी गोरिल्ला स्टाइल शूट केले आहे. त्यामुळे मला येथील काही परिवाराशी संवाद साधता आला. त्याचबरोबर त्या छोट्या खोल्यांमध्ये काही काळ व्यतीत करता आला.’

पुढे बोलताना शोभिताने सांगितले की, ‘भारतात लोकांची ओळख त्यांची जात, काम किंवा रंगावरून केली जाते. मात्र कमाठीपुरा भागात या गोष्टी गौण समजल्या जातात. विशेष म्हणजे एवढ्या हलाखीचे जीवन जगत असतानाही या महिला एकमेकींना समजून घेऊन याठिकाणी जगत आहेत. असो, शूटिंगबद्दल सांगायचे झाल्यास याठिकाणी शूटिंग करणे खूपच अवघड होते. आम्हाला दररोज २० तास याठिकाणी शूटिंग करावी लागली. हा अनुभव माझे आयुष्य बदलविणारा आहे. या चित्रपटात अनुराग कश्यप यांचे डायलॉग आहेत. तर गीतू मोहनदा यांचे दिग्दर्शन आहे. 

Web Title: OMG: Bollywood actress 'only' reached red light area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.