OMG! बॉलिवूडची ही स्टार किड आता शिक्षणाला करणार रामराम, अन् करियरवर करणार लक्ष केंद्रीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 15:29 IST2019-05-30T15:29:13+5:302019-05-30T15:29:59+5:30
नुकतेच या स्टार किडने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून ती आता पुढील शिक्षण घेणार नाही.

OMG! बॉलिवूडची ही स्टार किड आता शिक्षणाला करणार रामराम, अन् करियरवर करणार लक्ष केंद्रीत
स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून अनन्या पांडे हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या या चित्रपटातील अभिनयाचे सगळीकडे खूप कौतूक झाले. त्यानंतर आता ती पुढील शिक्षण करणार नसल्याचे समजते आहे. तिचे वडील चंकी पांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आता अनन्याने अभिनयावर लक्ष केंद्रीत केले आहे.
अनन्या पांडे हिच्या शिक्षणाला घेऊन मध्यंतरीच्या काळात चर्चा रंगली होती की ती परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी अप्लाय केले होते. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे अनन्याने सांगितले होते.
यावर चंकी पांडे म्हणाले की, हो तिेचे दोन युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन झाले होते. पण, तिला चित्रपटात काम करायचे होते म्हणून ती गेली नाही. मला वाटत नाही की आता ती युनिव्हर्सिटीला जाईल. आता तिने तिचे संपूर्ण लक्ष करियरवर केंद्रीत केले आहे.
चंकी पांडेने अनन्याच्या पदार्पणाचे कौतूक करत म्हणाले की, मला तिच्यावर खूप गर्व आहे. तिने खूप छान काम केले. मला भीती होती की ती नीट परफॉर्म करेल की नाही. पण तिने खूप चांगले काम केले. ती खूप हुशार आहे आणि तिला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.
अनन्या पांडे सोबत स्टुडंट ऑफ द ईयर२ मध्ये तारा सुतारिया व टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटानंतर आता ती पति पत्नी और वो सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे.