OMG! चिरंजीवीच्या चित्रपटात केवळ आठ मिनिटांच्या दृश्यावर ५४ कोटींचा खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 07:00 PM2018-09-30T19:00:03+5:302018-09-30T19:01:23+5:30

होय, या चित्रपटातील एका आठ मिनिटांच्या दृश्यासाठी थोडे थोडके नाहीत तर तब्बल ५४ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत

OMG! Chiranjeevi spends Rs 54 crore for Sye Raa Narasimha Reddy war scene | OMG! चिरंजीवीच्या चित्रपटात केवळ आठ मिनिटांच्या दृश्यावर ५४ कोटींचा खर्च!

OMG! चिरंजीवीच्या चित्रपटात केवळ आठ मिनिटांच्या दृश्यावर ५४ कोटींचा खर्च!

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार चिरंजीवीला कोण ओळखतं नाही? त्याच्या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स अंगावर शहारे आणतात. लवकरचं, अंगावर शहारे आणणारा चिरंजीवीचा असाच एक अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘सये रा नरसिम्हा रेड्डी’(Sye Raa Narasimha Reddy). तूर्तास हा चित्रपट त्याच्या बजेटमुळे चर्चेत आहे. होय, या चित्रपटातील एका आठ मिनिटांच्या दृश्यासाठी थोडे थोडके नाहीत तर तब्बल ५४ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. ५४ कोटींमध्ये संपूर्ण सिनेमा तयार होऊ शकतो. पण या चित्रपटातील केवळ एका आठ मिनिटांच्या लढाईच्या दृश्यावरचं एका संपूर्ण चित्रपटाच्या बजेटइतके पैसे खर्च करण्यात आलेत. अर्थात याला कारणही तसेच आहे. हा चित्रपट कुठल्याही स्थितीत सुपरडुपर हिट व्हावा, अशी एका व्यक्तिची इच्छा आहे आणि यासाठी ती व्यक्ती पाण्यासारखा पैसा खर्च करण्यास तयार आहे. ही व्यक्ती अन्य कुणी नसून चिरंजीवीचा चिरंजीव रामचरण तेजा आहे. वडिलांचा हा सिनेमा सुपरडुपर हिट व्हावा, केवळ हीच रामचरणची इच्छा आहे. सध्या जॉर्जियात सुरेंद्र रेड्डी दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. हैदराबादेतून सुमारे दीडशे जणांचे युनिट यासाठी जॉर्जियाला गेले आहे. याशिवाय जॉर्जियातील स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांची ६०० लोकांची टीमही या चित्रपटावर खपत आहे. चित्रपटासाठी हैदराबादेत खास डिझाईन केलेले हजारो  पोशाख सोबत नेण्यात आले आहेत. यावरून या चित्रपटाच्या भव्यतेची कल्पना यावी. चिरंजीवीचे चाहते साहजिकचं या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत.
‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर आता सर्रास बिग बजेट चित्रपट बनू लागले आहेत. निर्माते जोखिम स्वीकारून पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’, ब्रह्मास्त्र, 2.0 ही याची ताजी उदाहरणे आहेत. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा बजेटही २०० कोटी आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा बजेट २५० कोटींचा आहे. रजनीकांत व अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘2.0’चे बजेट तर तब्बल ५४२ कोटी रूपये आहे.

Web Title: OMG! Chiranjeevi spends Rs 54 crore for Sye Raa Narasimha Reddy war scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.